मुंबईतील चांदीवली येथील संघर्ष नगर रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. तसंच, सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं परिसरातील स्थानिक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ऐन पावसाळ्याच घरं रिकामी करण्याच्या सुचना दिल्यामुळं रहिवाशांचा मोठी गैर सोय होत आहे.
चांदिवलीत रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यानं काही कामगार देखील या पाण्यात वाहून गेल्याची भिती आता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काही तासांपूर्वीच मालाडच्या पिंपरीपाडा येथील झोपडपट्टीवर संरक्षक भिंत कोसळली. यामध्ये १८ जणांचा मृत्यू तर १३ जण जखमी असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळं मुसळधार पावसात या घडलेल्या घटनांनमुळं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मुसळधार पावसामुळं मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. कुर्ला येथे घरांमध्ये पाणी गेलं आहे. त्याशिवाय रेल्वे रुळ देखील पाण्याखाली गेले आहेत. अनेक गाड्या रद्द केल्या असून रेल्वे वाहतूक ही आता पुर्णपणे ठप्प झाल्याची माहिती मिळते आहे.
हेही वाचा -
कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू
मालाडमध्ये भिंत कोसळली, मृतांचा आकडा १८ वर