Advertisement

मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून उतरलं, अनेक विमानांचे मार्ग बदलले

रेल्वेसोबतच विमान सेवांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी भरलं आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवेवर याचा परिणाम झाला आहे.

मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून उतरलं, अनेक विमानांचे मार्ग बदलले
SHARES

मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे देखील ठप्प आहे. रेल्वेसोबतच विमान सेवांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. पावसामुळे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर पाणी भरलं आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवेवर याचा परिणाम झाला आहे.

या परिस्थितीत सोमवारी मध्यरात्री एक मोठी दुर्घटना सुदैवानं टळली आहे. जयपुरवरून मुंबईला येणारे विमान लँड करताना धावपट्टीवर उतरल्याची घटना घडली. सुदैवानं यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही

जयपुरवरून मुंबईला येणारे स्पाइसजेटचे एसजी ६२३७ हे विमान सोमवारी मध्यरात्री धावपट्टीवरून उतरल्याची घटना घडली. मुसळधार पावसामुळे विमान लँड करताना ही घटना घडल्याचं समोर आलंय. विमानातून प्रवास करणारे सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.



हेही वाचा

मालाडमध्ये भिंत कोसळली, मृतांचा आकडा १६ वर

कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळं शाळांना सुट्टी जाहीर, रेल्वे वाहतूक विस्कळीत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा