Advertisement

मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला आहे. तसंच, या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा
SHARES

मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक भागंत पाणी साचलं आहे. मात्र, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी 'मुंबईत पावसाचं पाणी तुंबलचं नाही', असं वक्तव्य केलं होतं. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महापौर यांना जाड भिंगाचा चष्मा पाठवला आहे. तसंच, या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे.

मुंबईची दुरावस्था

'मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर साहेब यांना मुंबईत तुंबलेलं पाणी, लोकांना झालेला त्रास दिसलाच नाही. ते स्वत: म्हणाले शिक्षक आहेत त्यामुळं खोटं बोलत नाही. त्यामुळं आम्हाला असं वाटतं की त्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम असावा. म्हणून खास महापौरांसाठी हा जाड भिंगाचा चष्मा आणला आहे. या चष्म्यातून तरी महापौरांना दिसावं, अशी आमची अपेक्षा आहे. हा चष्मा आम्ही महापौरांना कुरिअरनं पाठवत आहोत. ज्या नेत्यांना मुंबईची दुरावस्था दिसत नाही, त्या सर्वांसाठी मोफत चष्मा पाठवण्याचं काम मनसे करेल' असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

पाणी साचलं

मुसळधार पावसामुळं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, याबाबत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना विचारलं असता, 'मुंबई कुठंही तुंबली नाही, मुंबईत सर्व काही आलबेल सुरु आहे. तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करु नका', असं वक्तव्य केलं होतं.



हेही वाचा -

'करून दाखवलं', नवाब मलिक यांचा शिवसेनेला टोला

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रद्द



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा