Advertisement

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस रद्द

पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्यांना बसला. रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस  रद्द
SHARES

रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने मुंबईमधील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मंगळवारी सकाळी काही काळ लोकल सेवा ठप्प झाली होती. पावसाचा फटका लांब पल्ल्याच्या सर्वच गाड्यांना बसला. रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या अनेक ट्रेन रद्द केल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईबाहेर जाणाऱ्या ट्रेन रद्द झाल्या आहेत. रेल्वे प्रशासनानं ट्विटरवरून रद्द झालेल्या आणि अर्ध्या वाटेतूनच परतणाऱ्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. 

रद्द झालेल्या ट्रेन

50104/50103 रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर

22102/22101 मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस

12127/12128 मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस

17617/17618 नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस

12118/12117 मनमाड-एलटीटी-मनमाड एक्स्प्रेस

11139 मुंबई-गदग एक्स्प्रेस

11140 गदग-मुंबई एक्स्प्रेस

12110/12109 मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस

11010/11009 पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

12124/12123 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन

11023 मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस



हेही वाचा -

चांदीवलीत संघर्षनगरमध्ये रस्ता खचला, घरं खाली करण्याच्या सूचना

मुसळधार पावसामुळे विमान धावपट्टीवरून उतरलं, अनेक विमानांचे मार्ग बदलले



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा