'करून दाखवलं', नवाब मलिक यांचा शिवसेनेला टोला

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे.

SHARE

मुंबईतील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल होत असून पावसाचं पाणी घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पाणी साचल्यानं विरोधकांनी आता शिवसेना-भाजपवर टीका करण्यास सुरूवात केली आहेराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरात गुडघाभर पाणी शिरलं आहे. यासंदर्भातले फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर करत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्या घरातले फोटो ट्विट करून मुंबई महापालिकेचे आभार मानले आहेत. यासोबतच 'करून दाखवलं' असं म्हणत शिवसेनेलाही टोला लगावला आहे.

नवाब मलिकच नाही तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील भाजप-शिवेसनेवर टीका केली आहे. मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली आहे. मुंबईतील परिस्थितीला महानगरपालिका जवाबदार असून, 'भाजप-शिवसनेने करून नाही, तर भरून दाखवलं' अशा शब्दांता विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे.


हेही वाचा

भाजप-शिवसनेनं करून नाही, तर भरून दाखवलं- विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे

चांदीवलीत संघर्षनगरमध्ये रस्ता खचला, घरं खाली करण्याच्या सूचना


संबंधित विषय
ताज्या बातम्या