पोलिसांना करावी लागतेय तारेवरची कसरत, प्रशासन लक्ष देईल का ?

वर्षानुवर्ष या पोलिस ठाण्यात पाणी भरत असताना. प्रशासनाकडून मात्र कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. राजनच्या प्रत्यार्पणाची कागदपत्रे ही २६ जुलैच्या पावसात पोलिस ठाण्यात पाणी शिरल्यामुळे खराब झाली होती.

पोलिसांना करावी लागतेय तारेवरची कसरत, प्रशासन लक्ष देईल का ?
SHARES

मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसात दिवसरात्र नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलिसांच्या अनेक पोलिस ठाण्यात पाणी शिरले आहे. वर्षानुवर्ष या पोलिस ठाण्यात पाणी भरत असताना प्रशासनाकडून मात्र कोणतीही पाऊले उचलली जात नाहीत. राजनच्या प्रत्यार्पणाची कागदपत्रे २६ जुलैच्या पावसात पोलिस ठाण्यात पाणी शिरल्यामुळे खराब झाली होती. त्यामुळे ड्युटीसोबत पोलिस ठाण्यातील महत्वाची कागदपत्रे संभाळून ठेवण्याची दुहेरी जबाबदारी पोलिसांवर ओढवली आहे.


पोलिस ठाणी पाण्याखाली

मागील अनेक वर्षांपासून मुसळधार पावसात सखल भागात असलेली पोलिस ठाणी दरवर्षी पाण्याखाली जातात. हे माहित असतानाही गृह विभागाकडून पोलिसांसाठी ठोस पाऊले उचलली जात नाहीत. बालीमध्ये ज्या वेळी कुख्यात गुंड छोटा राजनला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांना प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागली होती. कारण राजनला एका गुन्ह्यात एलटी मार्ग पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्या हाताचे ठसे पोलिसांनी घेतले होते. ९० च्या दशकात राजन परदेशात पळून गेला. त्यामुळे त्याच्यावरील गुन्ह्यांची कागदपत्रे विविध पोलिस ठाण्यात तशीच पडून होती.


गुन्ह्यांची फाईलही भिजली

२६ जुलै २००५ मध्ये पडलेल्या पावसात एलटी मार्ग पोलिस ठाण्यात कंबरभर पाणी शिरले. त्या पाण्यात राजनवरील महत्वाच्या गुन्ह्यांची फाईलही भिजली होती. त्यामुळे नोव्हेंबर २०१५ मध्ये ज्या वेळी राजनला बाली विमानतळावर अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्या प्रत्यार्पणासाठी राजनवरील गुन्हे आणि त्याच्या हाताचे पोलिसांनी घेतलेले ठसे तेथील सुरक्षा एजन्सीने मागितले होते. त्यावेळी २६ जुलैच्या पावसात ती सर्व कागदपत्रे भिजून खराब झाल्याचे उघडकीस आले होते. त्यावेळी मुंबई पोलिसांना राजनचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली होती.


ठाणी मृत्यूच्या दाढेत

अशी अनेक उदाहणे डोळ्यासमोर असताना. गृहखात्याकडून मात्र यांचे कोणतेही पाऊले उचलली जात नाही. अनेक पोलिस ठाणीही सध्या धोकादायक स्थितीत आहे. त्यात खार, वडाळा टी.टी पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. नुकतेच वडाळा पोलिसांनी वर्षानुवर्ष प्रशासनासोबत केलेल्या पत्रव्यवहारानंतर त्यांना मागील महिन्यात नवीन पोलिस ठाण्यासाठी जागा देण्यात आली. मात्र आजही अनेक पोलिस ठाणी ही मृत्यूच्या दाढेत तशीच आहेत. दरवर्षी मुंबईतल्या लोकमान्य टिळक मार्ग , जे.जे.मार्ग , ना..जोशी मार्ग, वाकोला, साकीनाका, सायन- माटुंगा, आणि कस्तुरबा पोलिस ठाण्यात गुडघाभर पाणी भरते. दरवर्षी पावसात पोलिस ठाण्याची अवस्था पाहिली असता. बहुदा सर्व सामान्य पोलिसांबाबत प्रशासनाला कोणतेही गांभीर्य उरलेले नाही असेच दिसून येते.



हेही वाचा -

मालाड सब-वे : पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा