मालाड सब-वे : पाण्यात अडकलेल्या गाडीत दोघांचा मृत्यू

मुसळधार पावसात मालाड सब-वे पूर्णत: भरलेला पाहून देखील दोघांनी वेगातून त्या पाण्यातून गाडी नेण्याचे ठरवले. स्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र दोघांनी त्यांना न झुमानता वेगात गाडी सब-वेच्या पाण्यात नेली.

SHARE

मालाडच्या सब-वे मध्ये तुंबलेल्या पाण्यात गाडी नेण्याचा प्रयत्न दोन तरुणांच्या जिवावर बेतला. त्या दोघांची गाडी मालाडच्या सब-वे मध्ये अडकली. पण सब-वे मध्ये पाणी भरल्यानं त्यांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. अखेर त्या दोघांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहेया दोघांची ओळख पटली असून पोलिस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत असल्याची माहिती मालाड पोलिसांनी दिली.

मस्करी आली अंगलट

मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहेयाच पावसाचा आनंद घेण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडतातमालाडमध्ये  गुलशाप मुम्मताज अली शेख (३५), इरफान शहनवाज खान (३८हे दोघे त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतून फेरफटका मारण्यासाठी सोमवारी सकाळीच निघाले होतेदोघेही मालाड पूर्वेकडून मालाड पश्चिमेला जाण्यासाठी निघाले होतेत्यासाठी मालाड सब-वे जवळ ते आलेमात्र मुसळधार पावसात मालाड सब-वे पूर्णत: भरलेला पाहून ही दोघांनी वेगातून त्या पाण्यातून गाडी नेण्याचं ठरवलंस्थानिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्नही केलामात्र दोघांनी कुणालाही न जुमानता वेगात गाडी सब-वेच्या पाण्यात नेली.


गाडीतच दोघांचा मृत्यू

सब-वेत साचलेल्या पाण्यात गाडीबंद पडल्यानंतर गाडीचे दरवाजे उघडता न आल्यामुळे  दोघेही गाडीतच अडकलेगाडीची काच उघडता न आल्यामुळे दोघांनी गाडीची काच आतून फोडण्याचा प्रयत्न ही केला मात्र ते अपयशी ठरलेया दोघांचा पाण्यात बुडालेल्या गाडीतच गुदमरून मृत्यू झालापोलिसांनी त्यांची गाडी बाहेर काढली असून दोघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील शासकिय रुग्णालयात नेहण्यात आला आहेया प्रकरणी मालाड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत


हेही वाचा

मालाडमध्ये भिंत कोसळली, मृतांचा आकडा २१ वर

चांदीवलीत संघर्षनगरमध्ये रस्ता खचला, घरं खाली करण्याच्या सूचना


संबंधित विषय
ताज्या बातम्या