boycott Chinese products चीनच्या वस्तू खरेदी करणे थांबवा, अभिनेत्री कंगना रणौतचे आवाहन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अभिनेत्री कंगना रणौत ही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ती सतत काही ना काही कारणांमुळे किंवा तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. मात्र सध्या कंगनाने भारत-चीन मध्ये ताणलेल्या संबधांवरून भारतीयांना एक आवाहन केले आहे.  भारतीयांनी एकजूट होऊन चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकावा असे आवाहन करणारा एक व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत असून नागरिक आपली प्रतिक्रिया नोंदवून कंगणाच्या या आवाहनाला  पाठिंबा देत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमध्ये चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याबाबत उघडपणे  आवाहन करणारी करणारी कंगना ही पहिली अभिनेत्री आहे.

अभिनेत्री कंगना रणौत हिने गलवान खोऱ्यात चीनने भारतीय सैनिकांवर हल्ला करणाऱ्या चीनचा पुढे येऊन विरोध केला आहे. इतकच काय तर कंगनाने नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर अपलोड केला आहे. त्यात तिने चीन विरोधात भारतीय सैनिक सिमेवर उत्तर द्यायला सक्षम आहे. मात्र चीन बरोबरचे हे युद्ध लढण्यासाठी  नागरिकांनी ही एकजूट होणं गरजेचे आहे. एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य बनते की, सर्वच स्तरावर चीनचा विरोध केला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी चीनच्या वस्तूवर पूर्णतहा बहिष्कार घालायला हवा असे आवाहन कंगनाने केले आहे. आपल्या हाताची बोट जेव्हा कापली जातात. त्यावेळी जी वेदना होते. अगदी तशीच वेदना चीन आपल्याला लडाखमध्ये देत असल्याचे तिने या व्हिडिओत म्हटंले आहे.

हेही वाचाः-  देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार

सीमेवर चीनने आपले २० जवानांना फसवून त्यांना मारलं, त्या वीर मातांचे अश्रू, वीर पत्नींचा आक्रोश आणि त्यांच्या मुलांनी दिलेलं बलिदान हे आपण कसे काय विसरू शकतो, सीमेवर होणार युद्ध फक्त लष्कराचं आणि सरकारचं असते का ?, या लढाईत जनतेनेचे योगदान ही महत्वाचे आहे. चीनीवस्तूंवर बहिष्कार घालून आपण चीन विरोधातील लढाईत सहभागी होऊन चीनला हरवू या आणि भारताला जिंकवू या असे कंगनाने या व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच तिने इंग्रजाच्या साम्राज्याला हादरवण्यासाठी ज्या प्रमाणे आपल्या क्रांतिकारकांनी, गांधीजींनी  स्वदेशीचा नारा दिला होता. त्याच प्रमाणे आपण ही आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी स्वदेशी वस्तू खरेदीकरण्याला प्राधान्य देऊन भारताला संक्षम बनवू या असे आवाहन केले आहे. कंगनाच्या या व्हिडिओला सोशल मिडियावर ही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळते.  

पुढील बातमी
इतर बातम्या