Advertisement

देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बाेलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

देवेंद्र फडणवीस प्रसिद्धीसाठी काहीही बोलतात- शरद पवार
SHARES

भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच ऑफर होती, असं वक्तव्य करत  माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस यांच्याकडे सध्या भरपूर वेळ आहे. त्यामुळे ते काहीही बाेलून प्रसिद्धी (ncp chief sharad pawar slams bjp leader devendra fadnavis over his alliance comment) मिळवण्याचा प्रयत्न करतात, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांना प्रसारमाध्यमांनी या विषयावर प्रश्न केला असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होतं, असा खळबळजनक खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना केला होता. परंतु शिवसेनेला सोडून आपल्याला हे करता येणार नाही, असं ज्येष्ठ नेत्यांचं मत होतं. राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर शिवसेना देखील सोबत पाहिजेच. इतक्या स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. शिवाय अमित शाह यांनी देखील शरद पवार यांना पंतप्रधानांचं म्हणणं कळवलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादी पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार असूनसुद्धा आम्ही राष्ट्रवादीला तेव्हा सोबत घेतलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

अजित पवार यांच्यासोबत ८० तासांच्या सरकारबाबत काही पत्रकारांनी पुस्तकं देखील लिहिली आहेत. मात्र यात खरं काय आहे, ते केवळ मलाच ठाऊक आहे. आम्हाला त्यावेळी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. 'राष्ट्रवादी' म्हणजे 'अजित पवार' नाही. त्यासंदर्भात काही चर्चाही झाल्या होत्या. पण नंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. त्यानंतर आम्ही शांत झालो. पण नंतर आम्हाला अजित पवार यांच्याकडून फिगर आली. ३ पक्षांचं सरकार चालू शकत नाही, त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून स्थिर सरकार द्यावं, असं त्यांना वाटत होतं. म्हणून सकाळी तो शपथविधी झाला. या सरकारचे शिल्पकार अमित शाह होते, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

आज जरी तो निर्णय चुकीचा वाटत असला, तरी त्यावेळी जे पटलं ते केलं. ज्यावेळी तुमच्या पाठीत कुणी खंजीर खुपसत असेल, त्यावेळी तुम्हाला राजकीय पटलावर स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवावंच लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. माझ्या पाठिशी ते भक्कमपणे उभे आहेत. पण सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. मात्र आम्ही अमित शाहांना अर्ध्या रात्री देखील फोन करतो. त्यामुळे आमचा खूप चांगला संपर्क आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा