Advertisement

शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून धनगर समाजाला भडकवण्याचं काम केल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.

शरद पवार महाराष्ट्राला लागलेले कोरोना, गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून धनगर समाजाला भडकवण्याचं काम केल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर (ncp chief sharad pawar is a coronavirus of maharashtra says bjp leader gopichand padalkar) यांनी केलं आहे. पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पडळकरांच्या मताशी सहमत नसल्याचं म्हणत भाजपने या विधानावरून हात झटकले आहेत.

शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत. पण या काळात त्यांनी बहुजन समाजाला झुलवत ठेवून केवळ राजकारण केलं. बहुजन समाजाला कधीही पुढं येऊ दिलं नाही. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळे पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. खरं तर पवार यांची कुठलीही विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही. , अशी टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली आहे.

हेही वाचा - म्हणजे राज्यात सर्कस असल्याचं शरद पवारांना मान्य- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने धनगरांसाठी पॅकेज जाहीर केलं होतं. ज्यामध्ये ५ वसतिगृह, यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दलच्या निर्णयाचा समावेश आहे. परंतु विश्वासघातामुळे हे सरकार पडल्याने त्यावर कार्यवाही होऊ शकली नाही. 

सध्याचं सरकार वेगवेगळ्या समाजांच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाची केस देखील न्यायालयात सुरू आहे. पण त्यासाठी वकील दिले जात नाहीत, त्यांची फी दिली जात नाही, त्यांची बैठक होत नाही. राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मोठा समाज असूनही जर त्याची ही अवस्था असेल, तर इतर लहान समाजाची काय अवस्था होत असेल. त्यामुळे येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरू. कोरोनाचं संकट गेल्यानंतर धनगर आरक्षणासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरतील, असं आव्हानही पडळकर यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

यासंदर्भात विचारला असता, शरद पवार यांच्याशी आमचे राजकीय मतभेद आहेत. त्यांचं राजकारण आणि विचारधारेशी आम्ही असहमत आहोत. पण पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत पडळकरांनी असं विधान करायला नको होतं. पवारांबाबत पडळकरांनी केलेल्या विधानाशी सहमत नाही, असं भाजपचं आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितलं. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा