Advertisement

म्हणजे राज्यात सर्कस असल्याचं शरद पवारांना मान्य- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रात सर्कस आहे, त्यात प्राणीही आहेत, फक्त विदुषकाची कमतरता आहे, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात सर्कस असल्याचं मान्य केलं आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं.

म्हणजे राज्यात सर्कस असल्याचं शरद पवारांना मान्य- चंद्रकांत पाटील
SHARES

महाराष्ट्रात सर्कस आहे, त्यात प्राणीही आहेत, फक्त विदुषकाची कमतरता आहे, असं म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकप्रकारे राज्यात सर्कस असल्याचं मान्य केलं आहे, असं वक्तव्य करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि पवार यांच्या वादात उडी घेतली.

वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी माध्यमांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, कोकणात निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे सगळ्यात पहिल्यांदा तिथं गेले होते. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार कोकणचे दौरे केले. कृषी किंवा साखर उद्योगाबद्दल शरद पवार यांना असलेल्या ज्ञानाची मला पूर्ण कल्पना आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका असायचं कारण नाही. 

हेही वाचा - महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू, राजनाथ सिंग यांची टीका

मी त्यांच्याबद्दल बोलत असतो याच अर्थ त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर नाही, असा होत नाही. मी याआधीही दिल्लीत अनेकदा त्यांची भेट घेतली आहे. पण राजकारणात एखाद्याने चेंडू टोलवला की दुसऱ्यालाही तो टोलावणं भाग पडतं, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार असल्याने राजनाथसिंह यांनी या सरकारचा सर्कस असा उल्लेख केल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय. अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. राज्याची सगळी सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व प्रचंड राजकीय व प्रशासकीय अनुभव असलेल्या शरद पवार यांच्याकडे आहेत. तरी देखील राज्यातील सरकार इतकं अकार्यक्षम कसं होऊ शकतं? असा प्रश्न देखील राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला होता.

त्याला उत्तर देताना शरद पवार यांनी राज्यात सर्कस सुरू आहे आणि त्यात प्राणीही आहेत, फक्त विदुषकाची कमतरता आहे, असं म्हणत राजनाथ सिंह यांना टोला लगावला होता.

हेही वाचा - सर्कशीत विदुषकाची कमी, शरद पवारांचं राजनाथ सिंग यांना प्रत्युत्तर

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा