Advertisement

महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू, राजनाथ सिंग यांची टीका

महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय. अशा शब्दांत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू, राजनाथ सिंग यांची टीका
SHARES

महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय. अशा शब्दांत भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने राज्याराज्यांमध्ये आभासी सभा आयोजित केल्या आहेत. सोमवारी राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र जनसंवाद रॅली अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली.

कोरोनाचं संकट

यावेळी राजनाथ सिंग म्हणाले, राज्यात कोरोनाचं संकट गंभीर बनलं असून त्याची योग्य रितीने हाताळणी करण्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. रेल्वे मंत्रालयाने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन तयार ठेवल्या. पण महाराष्ट्रातील सरकारला मजुरांची यादीही वेळेत देता आली नाही, यामुळे पूर्ण वेळापत्रक कोलमडलं. महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय. कोरोनामुळे ज्या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली आहे, तो गंभीर विषय आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य तेवढी मदत मोदी सरकार करत आहे. 

हेही वाचा- सोनू सूद प्रकरणावरून फडणवीसांनी मानले चक्क शिवसेनेचे आभार

सूत्रे त्यांच्या हाती

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. राज्याची सगळी सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व प्रचंड राजकीय व प्रशासकीय अनुभव असलेल्या शरद पवार यांच्याकडे आहेत. तरी देखील राज्यातील सरकार इतकं अकार्यक्षम कसं होऊ शकतं? हे सरकार इतकं दिशाहीन होईल याची कल्पनाही केली नव्हती. कोरोनाचा प्रश्न सक्षमपणे हाताळणाऱ्या उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांकडून महाराष्ट्राने धडे घेण्याची गरज आहे. 

विधानसभा निवडणूक शिवसेना व भाजप एकत्रित लढले, पण सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपला दगा दिला. निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. परंतु भाजपसोबत दगाफटका झाला. जनमताच्या कौलापुढं स्वार्थ जिंकला. असं फसवणुकीचं राजकारण भाजप कधीही करणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना हीच का, असा आता प्रश्न पडला आहे, अशी टीका राजनाथ सिंग यांनी केली. 

हेही वाचा- शिवसेनेच्या टीकेला अर्थ नाही- देवेंद्र फडणवीस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा