Advertisement

सोनू सूद प्रकरणावरून फडणवीसांनी मानले चक्क शिवसेनेचे आभार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अभिनेता सोनू सूद याने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्याचं समजाकार्य स्वतःच्या हिंमतीवर केलं आहे. त्यामुळे त्याच्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे.

सोनू सूद प्रकरणावरून फडणवीसांनी मानले चक्क शिवसेनेचे आभार
SHARES

महाराष्ट्रात लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्याचं काम करून कौतुकाचा धनी ठरलेला अभिनेता सोनू सूद याचं नाव भाजपशी जोडल्याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्क शिवसेनेचे आभार मानले आहेत. निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणासाठी भाजपाकडून मदत पाठवण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.

चांगलं काम करणारे भाजपात

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अभिनेता सोनू सूद याने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्याचं समजाकार्य स्वतःच्या हिंमतीवर केलं आहे. त्यामुळे त्याच्या कामाचं कौतुक झालंच पाहिजे. कोणीही चांगलं काम केलं तर त्या कामाचं कौतुक झालं पाहिजे. सोनू सूद यांनी चांगलं काम केल्याबरोबर ते भाजपाचे आहेत, असं सांगितलं गेलं. यावरून शिवसेनेचा ठाम विश्वास दिसतो की चांगलं काम करणारे हे भाजपामध्येच आहेत. आम्हाला याचा आनंद आहे आणि मी त्यांचा आभारी आहे, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

हेही वाचा - भाजपने सोनू सूदला प्यादं म्हणून वापरलं? संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

राजकारण करणं चुकीचं

आम्ही जेव्हा जलायुक्त शिवारचं काम करत होतो तेव्हा नाम संस्था आणि आमिर खान यांचीही सरकारच्या कामात मदत व्हायची. परंतु आम्ही हेवादावा न करता त्यांच्या कामाचं कौतुकच केलं. जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे आणि त्यांना मदतही केली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. अशा बाबतीत राजकारण करणं हे पूर्णपणे चुकीचं असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काय म्हणाले होते राऊत?

कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादं म्हणून वापरलं काय? असा प्रश्न विचारत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सोनू सूद याच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

हेही वाचा - सोनू सूदनं घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा