Advertisement

शिवसेनेच्या टीकेला अर्थ नाही- देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारने घाईने लाॅकडाऊन लागू केला, असं आता म्हटलं जात आहे. अशा सूचक शब्दांत शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केलेल्या टीकेला काहीही अर्थ नाही आणि मूल्यही नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला हाणला.

शिवसेनेच्या टीकेला अर्थ नाही- देवेंद्र फडणवीस
SHARES

केंद्र सरकारने घाईने लाॅकडाऊन लागू केला, असं आता म्हटलं जात आहे. अशा सूचक शब्दांत शिवसेनेने केंद्र सरकारवर टीका केलेल्या टीकेला काहीही अर्थ नाही आणि मूल्यही (criticism from shiv sena has no value says bjp leader devendra fadnavis) नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला हाणला. सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. 

आधी महाराष्ट्रात

यासंदर्भात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने देशव्यापी लाॅकडाऊन लागू करण्याआधी महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरू झाला होता. मग लॉकडाऊन लागू करण्याची घाई नेमकी कुणी केली? केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पावलांवर पाऊल ठेवत असल्याच्या जाहिराती तेव्हा करण्यात आल्या. त्यावेळी फुशारकी मारणाऱ्यांना आता त्याचा विसर पडलेला दिसतोय. म्हणूनच लाॅकडाऊन लागू करताना केंद्राने घाई केली अशी ओरड केली जाते आहे, असंं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा -कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात परिस्थिती वाईट

कोरोनाचं संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे. खासकरून मुंबईतील स्थिती बिघडत चालली आहे. जेवढ्या चाचण्या व्हायला हव्यात आहेत, तेवढ्या होताना दिसत नाहीत. खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा सरकारने ताब्यात घेतल्याचं कागदोपत्री सांगितलं जात आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. कोरोना रुग्णांना वेळेत खाटा उपलब्ध होत नाहीत. वगैरे याही फक्त घोषणा आहेत. लाॅकडाऊन वाढल्यानंतर परप्रांतीय मजूर मिळेल त्या वाटेने पायी चालत आपल्या गावाकडे निघाले. तेव्हा आपल्यावरचं संकट टळलं, अशीच सरकारची भूमिका होती. परंतु या परप्रांतीयांना थांबवून त्यांची जाण्याची व्यवस्था करायला हवी हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मी दिला होता, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 

विरोधकाची भूमिका

मागील सरकारमध्ये भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेना विरोधकाच्या भूमिकेतच काम करत होती. कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर टीका करायची, तर कधी त्यांच्या कामाचं कौतुक करायचं. याप्रकारे शिवसेनेची भूमिका रोज बदलायची. कधी राज्यपालांना नावं ठेवायची, तर कधी कुर्निसात करायचा, असं शिवसेनेचं धोरण आहे. त्यामुळे शिवसेनेच्या टीकेला अर्थ, तत्त्व आणि मूल्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

हेही वाचा - राष्ट्रविरोधी कृत्याचा ठपका असलेल्या ‘पीएफआय’ला काम कसं दिलं? फडणवीसांचा महापालिकेवर निशाणा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा