Advertisement

कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हे नसताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप
SHARES
Advertisement

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याची चिन्हे नसताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून फडणवीस यांनी मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या (coronavirus live updates bjp leader devendra fadnavis wrote a letter to cm uddhav thackeray over covid 19 test decrease in mumbai) चाचण्या, वाढत असलेला मृत्यूदर तसंच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक मृत्यू नमूद करून तो अंत्यविधीसाठी दिल्यानंतर पाॅझिटिव्ह ठरल्याने वाढलेला धोका या मुद्द्यांकडे लक्ष वेधलं आहे. 

मृत्यूच्या प्रमाणात वाढ

आपल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील (१ मे २०२० रोजी) एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचं प्रमाण हे ५६ टक्के होतं. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या. १५ मे २०२० रोजी हे प्रमाण ४०.५ टक्क्यांवर आणण्यात आलं. आणि आता ३१ मे २०२० रोजीची आकडेवारी पाहिली तर चाचण्यांच हेच प्रमाण २७ टक्क्यांवर आलं आहे. म्हणून आधी होत असलेल्या चाचण्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी. मुंबईतील घटत्या चाचण्या या नक्कीच चिंतेची बाब आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं प्रमाणही उच्चांक गाठत आहे. २७ मे २०२० रोजी पर्यंत सर्वाधिक १०५ बळींची नोंद झाली होती. २९ मे २०२० रोजी ही संख्या ११६ वर पोहोचली. आणि आता ३ जून २०२० रोजी १२२ बळी असा नवा उच्चांक प्रस्थापित झाला. मुंबईबाबत विचार केला असता, आजपर्यंत सर्वाधिक ६४ बळी ३० मे २०२० रोजी गेले होते. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकी ४९ बळी एकट्या मुंबईतील आहेत. 

हेही वाचा - मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, देवेंद्र फडणवीसांची मागणी

कोरोना शब्द वगळला

कोरोनाबाधितांची मृत्यूसंख्या ही शासकीय प्रसिद्धी पत्रकात असली, तरी अनेकांच्या मृत्यू प्रमाणपत्रातून कोरोना किंवा कोरोना संशयित हा शब्द वगळण्यात आल्याचे सुद्धा प्रकार उघडकीस येत आहेत. परिणामी अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी गर्दी आणि त्यातून कोरोना पसरण्याचा धोका याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे आपण तातडीने याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

मुंबई निसर्ग चक्रीवादळातून वाचली. एनडीआरएफ, एसडीआरएफ यांसारख्या संस्थांनी अतिशय चांगल्या समन्वयातून स्थिती हाताळली. पण कोरोनाच्या वादळाची देखील आपल्याला गांभीर्याने देखल घ्यावी लागेल. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल. कोरोना बळी स्पष्टपणे नमूद केलं, तर त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचं विलगीकरण होईल, कोरोना पसरण्यापासून रोखेल.

चाचणी दुप्पट व्हावी

मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवण्याच्या आग्रहामागे आणखी एक कारण म्हणजे १ मे ते २४ मे दरम्यान झालेल्या चाचण्यांमध्ये पात्र नमुन्यांपैकी युनिक पाॅझिटिव्ह नमुने ३२ टक्के, तर ३१ मे रोजी जवळपास ३१ टक्के आहे. जेव्हा संक्रमणाचा दर इतका अधिक असतो, तेव्हा नमुने तपासणीचा वेग पूर्वीपेक्षा दुप्पट होणं आवश्यक असतो. इथं मात्र हाच वेग ५० टक्क्यांहून कमी करण्यात आला आहे. मुंबईत १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ ३५०० ते ४ हजार चाचण्याच होत आहेत. कोरोनाची आकडेवारी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर कोरोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं. 

हेही वाचा -राहुल गांधी अपयशाचं सगळं खापर शिवसेनेवर फोडताहेत- देवेंद्र फडणवीस

संबंधित विषय
Advertisement