Advertisement

मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, देवेंद्र फडणवीसांची मागणी

केवळ अधिक चाचण्या केल्याचा दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, देवेंद्र फडणवीसांची मागणी
SHARES

मुंबईत दिवसाला १० हजार कोरोना चाचण्यांची क्षमता (covid-19 test in mumbai should be increase) असताना प्रत्यक्षात, मात्र दिवसाला केवळ ४ ते साडेचार हजार चाचण्याच केल्या जात आहेत. केवळ अधिक चाचण्या केल्याचा दावा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही. त्यामुळे मुंबईतील कोरोना चाचण्या वाढविण्याची नितांत गरज असल्याची मागणी भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (bjp leader devendra fadnavis) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

देशातील एकूण चाचण्या 

कोरोनाबाधित रुग्ण (coronavirus positive patient) शोधून काढत त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्वात आवश्यक बाब ठरते ती म्हणजे कोरोना चाचणी. जितक्या अधिक कोरोना चाचण्या होतील, तितक्या जलदगतीने कोरोना रुग्णांवर उपचार करून संसर्गाला आळा घालता येईल, असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना चाचण्यांची आवश्यकता पटवून सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी देशात झालेल्या एकूण कोरोना चाचण्यांची महाराष्ट्राशी तुलना केली आहे. 

१८ मे रोजीपर्यंत एकूण झालेल्या चाचण्या व त्यातील किती रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्याचा तक्ता:

  • भारत: ४.१७ टक्के 
  • (एकूण चाचण्या: २३,०२,७९२ /पॉझिटिव्ह रूग्ण: ९६,१६९)
  • महाराष्ट्र: १२.४३ टक्के 
  • (एकूण चाचण्या: २,८२,००० /पॉझिटिव्ह रूग्ण: ३५,०५८)
  • मुंबई: १३.१७ टक्के 
  • (एकूण चाचण्या: १,६२,००० /पॉझिटिव्ह रूग्ण : २१,३३५)

याचाच अर्थ झालेल्या एकूण चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणार्‍या रूग्णांचं प्रमाण हे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात तीनपट अधिक आहे आणि मुंबईत ते त्याहून अधिक आहे. अशात एकाच व्यक्तीच्या झालेल्या अनेक चाचण्यांची संख्या (एकाच व्यक्तीच्या दोन वा तीनदा चाचण्या केल्या जातात. रूग्णाला सुटी देण्यापूर्वी सलग दोन दिवस त्याची चाचणी निगेटिव्ह येणे आवश्यक आहे.) वजा केली, तर मुंबईत कोरोना पॉझिटिव्हीट रुग्णांचं प्रमाण हे जवळजवळ २२ टक्के आहे, असं देवेंद्र फडणवीस सांगतात.

हेही वाचा - महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी

१० हजार चाचण्यांची क्षमता

या स्थितीत मुंबईतील चाचण्यांची संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. मुंबईत दिवसाला १० हजार चाचणीची क्षमता असताना प्रत्यक्षात, मात्र दिवसाला ४ ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. हे संकट पूर्णत: ओळखल्याशिवाय आणि ते हाताळण्यास सज्ज झाल्याशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकणार नाही. केवळ अधिक चाचण्या केल्याचा दावा हा नागरिकांना कोरोनाच्या संकटापासून वाचवू शकणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

३९ हजार कोरोनाबाधित

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली असून बुधवारी २२५० नवीन कोरोनाबाधित रुग्णांचं निदान झालं आहे. त्यातही एकट्या मुंबईत २४,११८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यभरात १० हजार ३१८७रुग्ण बरे झाल्याने सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

तर, आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ०७ हजार ७२ नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार ७७५जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले असून ३९ हजार २९७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ०४ हजार ६९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २६ हजार ७५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा