Advertisement

भाजपचं वागणं म्हणजे महाराष्ट्रद्रोहच, बाळासाहेब थोरातांची जळजळीत टीका

भाजपच्या नेत्यांची निष्ठा महाराष्ट्रातील जनतेशी नसून केंद्रातील नेत्यांशी आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

भाजपचं वागणं म्हणजे महाराष्ट्रद्रोहच, बाळासाहेब थोरातांची जळजळीत टीका
SHARES

कोरोनाच्या संकटात (coronavirus) राजकारण करायचं नाही असं भाजपचे नेते फक्त बोलतात. प्रत्यक्षात राज्य सरकार अडचणीत कसं येईल, महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण कसं निर्माण होईल, अशीच भाजपच्या नेत्यांची कृती असते. संकटकाळात भाजपच्या (protest from bjp) या वागण्याला महाराष्ट्रद्रोहच म्हणावे लागेल, असा आरोप राज्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (maharashtra revenue minister balasaheb thorat) यांनी भाजपवर केला आहे.

ऐकायला तयार पण..

भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आणि 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनावर प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सरकार बरोबर बोलायचं नाही. त्यांना रोज राजभवनावर जाऊन फक्त राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचं ऐकायला तयार आहोत, आमचं चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तयार आहोत, मात्र त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे.

हेही वाचा - काळं आंदोलन कुणाच्या डोक्यातली कल्पना? भाजपच्या आंदोलनावर अजित पवारांचा हल्लाबोल

निष्ठा केंद्रातील नेत्यांशी

राज्याकडून पॅकेजची मागणी करणाऱ्या फडणवीसांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी पॅकेज आणलं असतं, तर आम्हाला कौतुक वाटलं असतं. मात्र त्यांनी तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याऐवजी PMCares ला मदत केली. त्यांची निष्ठा महाराष्ट्रातील जनतेशी नसून केंद्रातील नेत्यांशी आहे, अशी टीका देखील बाळासाहेब थोरात यांनी केली. 

भाजपचं आंदोलन 

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi government) पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने राज्य सरकारविरोधात 'माझं अंगण रणांगण' आणि 'महाराष्ट्र बचाव' या आंदोलनाची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारला (thackeray government) जागं करण्यासाठी येत्या २२ तारखेला घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन निषेध नोंदण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp maharashtra president chandrakant patil) यांनी केलं आहे.

अनाकलनीय आंदोलन

तर, भाजपने परिस्थितीचं भान न ठेवता पुकारलेलं हे अनाकलनीय आंदोलन आहे. त्यातून ना महाराष्ट्राचं भलं होईल, ना भाजपचं. कोरोनाविरूद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक जण खारीचा वाटा उचलत असताना अशा प्रकारचं 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात येऊच कशी येऊ शकते?, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - कोरोनाविरूद्धच्या लढ्यात ठाकरे सरकार अपयशी, भाजपने केली मेरा आंगण, मेरा रणांगण आंदोलनाची घोषणा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा