Advertisement

काळं आंदोलन कुणाच्या डोक्यातली कल्पना? भाजपच्या आंदोलनावर अजित पवारांचा हल्लाबोल

अशा प्रकारचं 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात येऊच कशी येऊ शकते?, असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

काळं आंदोलन कुणाच्या डोक्यातली कल्पना? भाजपच्या आंदोलनावर अजित पवारांचा हल्लाबोल
SHARES

स्वत:च्या घराच्या अंगणालाच रणांगण बनवणं यांत कसंल आलंय शहाणपण? कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करून लढा देत असताना त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक दाखवून आंदोलन (bjp protest) करणं हा या कोरोना योद्ध्यांचा नव्हे, तर राज्यातील जनतेचा अपमान आहे. परंतु महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा हा प्रयत्न जनता हाणून पाडेल, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (maharashtra dputy cm ajit pawar) यांनी भाजपच्या आंदोलनावर चढाई केली.

याउलट भाजपाने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावं, महाराष्ट्रविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असा सल्लाही अजित पवार यांनी भाजपाला दिला.

भाजपचं आंदोलन

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार (mahavikas aghadi government) पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपने राज्य सरकारविरोधात 'माझं अंगण रणांगण' आणि 'महाराष्ट्र बचाव' या आंदोलनाची घोषणा केली आहे. ठाकरे सरकारला (thackeray government) जागं करण्यासाठी येत्या २२ तारखेला घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन निषेध नोंदण्याचं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (bjp maharashtra president chandrakant patil) यांनी केलं आहे.

हेही वाचा - कोरोनाविरूद्धच्या लढ्यात ठाकरे सरकार अपयशी, भाजपने केली मेरा आंगण, मेरा रणांगण आंदोलनाची घोषणा

काळं आंदोलन  

यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, भाजपने परिस्थितीचं भान न ठेवता पुकारलेलं हे अनाकलनीय आंदोलन आहे. त्यातून ना महाराष्ट्राचं भलं होईल, ना भाजपचं. कोरोनाविरूद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक जण खारीचा वाटा उचलत असताना अशा प्रकारचं 'काळं' आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात येऊच कशी येऊ शकते?, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.

आव्हानांवर मात करू

मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आरोग्य सेवा सक्षम करण्यात आली आहे. १५ मेपर्यंत मुंबईत साडेसहा लाख कोरोना रुग्ण असतील,’ असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु सद्यस्थितीत राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४० हजारांच्या आत आहे. तर १० हजार रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. राज्याने गेला सव्वा महिना ६ लाखांहून अधिक परप्रांतीय मजुरांची निवास, भोजन आणि वैद्यकीय उपचारांची सोय केली. आतापर्यंत ५ लाख परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात सुखरुप परतले आहेत. त्यामुळे सर्व आव्हानांवर मात करुन आपण ही लढाई जिंकू, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - महाराष्ट्राला दरमहा १० हजार कोटी द्या, अजित पवारांची केंद्राकडे मागणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा