Advertisement

राष्ट्रविरोधी कृत्याचा ठपका असलेल्या ‘पीएफआय’ला काम कसं दिलं? फडणवीसांचा महापालिकेवर निशाणा

कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेण्यास कुणी पुढे येत नाही. त्यामुळे आमच्या संघटनेकडून राज्यात आतापर्यंत १४० मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे, अशी माहिती देखील सादात यांनी दिली आहे.

राष्ट्रविरोधी कृत्याचा ठपका असलेल्या ‘पीएफआय’ला काम कसं दिलं? फडणवीसांचा महापालिकेवर निशाणा
SHARES

मुस्लिम कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना (Devendra Fadnavis raised objection over the decision taken by BMC to allow Popular Front of India to facilitate the burial of deceased COVID-19 Muslim patients ) दिल्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. यावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने भाजप घाणेरडं राजकारण करत असल्याचं प्रतिउत्तर फडणवीस यांना दिलं आहे.  

कोरोनामुळे मुस्लिम समाजातील व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं काम हे मुंबई महापालिकेकडून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला देण्यात आलं आहे. हे वाचून मला धक्का बसला. ही संघटना देश विरोधी आणि समाज विरोधी कृत्यांसाठी ओळखली जाते, मग त्यांच्यावर ही जबाबदारी का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रकार मान्य आहे का? आणि जर हे मान्य नसल्यास या प्रकरणी कोणती कठोर कारवाई करणार असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाचं एक पत्र प्रसिद्ध केलं होतं.

हेही वाचा - आम्ही महाराष्ट्राच्या पाठिशी, केजरीवालांचा उद्धव ठाकरेंना ‘सपोर्ट’

फडणवीस यांच्या आरोपांना पीएफआय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सय्यद युसुफ सादात यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून उत्तर दिलं आहे. या पत्रात सादात म्हणतात की, लॉकडाउनची घोषणा झाल्यानंतर पीएफआय संघटनेकडून कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेण्यात आलं होतं. या कामाची सुरुवात पुणे महापालिकेकडून करण्यात आली. पुणे महापालिकेकडून पीएफआय संघटनेला तशी परवानगीही देण्यात आली. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसला नाही का?  मुंबई पालिका ही शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे केवळ शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून घाणरेडे राजकारण करण्यात असून त्यासाठी पीएफआय संघटनेचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेण्यास कुणी पुढे येत नाही. त्यामुळे आमच्या संघटनेकडून राज्यात आतापर्यंत १४० मृतदेहांची विल्हेवाट लावली आहे, अशी माहिती देखील सादात यांनी दिली आहे. 

 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा