Advertisement

सर्कशीत विदुषकाची कमी, शरद पवारांचं राजनाथ सिंग यांना प्रत्युत्तर

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणारे भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जशास तसं उत्तर दिलं आहे.

सर्कशीत विदुषकाची कमी, शरद पवारांचं राजनाथ सिंग यांना प्रत्युत्तर
SHARES

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणारे भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच जशास तसं उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, पण, विदुषकाची (ncp chief sharad pawar called bjp leader rajnath singh a clown) मात्र कमतरता आहे. असं म्हणत पवार यांनी राजनाथ सिंह यांना टोला लगावला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणच्या पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं.

काय म्हणाले होते राजनाथ सिंह?

केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने राज्याराज्यांमध्ये आभासी सभा आयोजित केल्या होत्या. सोमवारी राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र जनसंवाद रॅली अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात कोरोनाचं संकट गंभीर बनलं असून त्याची योग्य रितीने हाताळणी करण्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. रेल्वे मंत्रालयाने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन तयार ठेवल्या. पण महाराष्ट्रातील सरकारला मजुरांची यादीही वेळेत देता आली नाही, यामुळे पूर्ण वेळापत्रक कोलमडलं. महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय.

हेही वाचा - ठाकरे सरकार सर्कस नव्हे, हे तर राजनाथ सिंग यांचे अनुभवाचे बोल- नवाब मलिक

सूत्रे पवारांच्या हाती

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. राज्याची सगळी सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व प्रचंड राजकीय व प्रशासकीय अनुभव असलेल्या शरद पवार यांच्याकडे आहेत. तरी देखील राज्यातील सरकार इतकं अकार्यक्षम कसं होऊ शकतं? हे सरकार इतकं दिशाहीन होईल याची कल्पनाही केली नव्हती. कोरोनाचा प्रश्न सक्षमपणे हाताळणाऱ्या उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांकडून महाराष्ट्राने धडे घेण्याची गरज आहे.  

पवारांचं उत्तर

यासंदर्भात कोकणच्या दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, सर्कशीत प्राणी असतात. आमच्या सरकारमध्ये देखील प्राणी आहेत. परंतु विदुषकाची मात्र कमरता आहे, असं म्हणत पवार यांनी राजनाथ सिंह यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.

याअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं होतं. रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही सरकारला सर्कस म्हणतात. हे तर अनुभवाचे बोल आहेत. असं म्हणत नवाब मलिक यांनी राजनाथ सिंग यांना शालजोडीतले लगावले होते.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा