Advertisement

ठाकरे सरकार सर्कस नव्हे, हे तर राजनाथ सिंग यांचे अनुभवाचे बोल- नवाब मलिक

महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय, अशी टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केली होती.

ठाकरे सरकार सर्कस नव्हे, हे तर राजनाथ सिंग यांचे अनुभवाचे बोल- नवाब मलिक
SHARES

महाविकास आघाडीला सर्कस संबाेधणारे भाजप नेते आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (coronavirus live updates ncp leader nawab malik replies bjp defence minister rajnath singh criticism on maha vikas aghadi government) यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही सरकारला सर्कस म्हणतात. हे तर अनुभवाचे बोल आहेत. अशा शब्दांत नवाब मलिक यांनी राजनाथ सिंग यांना शालजोडीतले लगावले आहेत.

महाराष्ट्रात लोकशाहीच्या माध्यमातून चालवण्यात येणारं महाविकास आघाडीचं सरकार उत्तम काम करत आहे. कोविड १९ संकटाच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने मुंबई माॅडलची प्रशंसा देखील केली आहे. तरीही रिंग मास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारमधील मंत्री राजनाथ सिंग लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. अनुभवाचे बोल., अशा शब्दांत नवाब मलिक यांनी राजनाथ सिंग यांच्यावर टीका केली आहे. 

हेही वाचा - राज्यातलं सरकार पूर्णपणे स्थिर- नवाब मलिक

काय म्हटले होते राजनाथ सिंग?

केंद्रातील मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपने राज्याराज्यांमध्ये आभासी सभा आयोजित केल्या आहेत. सोमवारी राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्र जनसंवाद रॅली अंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात कोरोनाचं संकट गंभीर बनलं असून त्याची योग्य रितीने हाताळणी करण्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. रेल्वे मंत्रालयाने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन तयार ठेवल्या. पण महाराष्ट्रातील सरकारला मजुरांची यादीही वेळेत देता आली नाही, यामुळे पूर्ण वेळापत्रक कोलमडलं. महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलंही व्हिजन नाहीय.

सूत्रे त्यांच्या हाती

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. राज्याची सगळी सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व प्रचंड राजकीय व प्रशासकीय अनुभव असलेल्या शरद पवार यांच्याकडे आहेत. तरी देखील राज्यातील सरकार इतकं अकार्यक्षम कसं होऊ शकतं? हे सरकार इतकं दिशाहीन होईल याची कल्पनाही केली नव्हती. कोरोनाचा प्रश्न सक्षमपणे हाताळणाऱ्या उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यांकडून महाराष्ट्राने धडे घेण्याची गरज आहे. 

विधानसभा निवडणूक शिवसेना व भाजप एकत्रित लढले, पण सत्तेच्या हव्यासापोटी शिवसेनेने भाजपला दगा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना हीच का, असा आता प्रश्न पडला आहे, अशी टीका राजनाथ सिंग यांनी केली होती. 

हेही वाचा - पियुषजी घाणेरडं राजकारण थांबवा, श्रमिक ट्रेनच्या गोंधळावरून नवाब मलिकांची टीका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा