Advertisement

पियुषजी घाणेरडं राजकारण थांबवा, श्रमिक ट्रेनच्या गोंधळावरून नवाब मलिकांची टीका

श्रमिक ट्रेनच्या नावाखाली सुरू असलेलं घाणेरडं राजकारण थांबवा अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पियुष गोयल यांना सुनावलं आहे.

पियुषजी घाणेरडं राजकारण थांबवा, श्रमिक ट्रेनच्या गोंधळावरून नवाब मलिकांची टीका
SHARES

मागच्या दोन दिवसांपासून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल (railway minister piyush goel) श्रमिक ट्रेन सोडण्यावरून महाराष्ट्र सरकारला सातत्याने लक्ष्य करत आहेत. परप्रांतीय मजुरांना परराज्यात पाठवण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोपही गोयल यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे, त्यावर भाष्य करताना श्रमिक ट्रेनच्या नावाखाली सुरू असलेलं घाणेरडं राजकारण थांबवा (stop politics over shramik special train), अशा शब्दांत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (ncp leader nawab malik) यांनी त्यांना सुनावलं आहे. 

अडीच वाजता यादी

परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्यासाठी महाराष्ट्र सरकार (maharashtra government) रोज ८० ट्रेन मागत असताना रेल्वेकडून निम्म्या म्हणजेच ४० ट्रेन उपलब्ध होत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी साधलेल्या संवादात केलं होतं. मुख्यमंत्र्यांचं बोलणं खुपल्याने रात्री अडीच वाजता रेल्वेकडून महाराष्ट्राला गाड्यांचं शेड्युल पाठवण्यात आलं. यापैकी बहुतांश गाड्या दुपारी १२ वाजेच्या असल्याने व्यवस्था करता आली नाही, असा दावा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. 

हेही वाचा - रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रासोबत रडीचा डाव खेळतंय, अनिल परब यांचा आरोप

महाराष्ट्र सरकार अपयशी

तर, हाच मुद्दा धरून पियुष गोयल यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं. महाराष्ट्राने १४५ ट्रेन मागितल्यानंतर आम्ही रात्रभर आढावा घेऊन त्यांना १४५ ट्रेन पाठवल्या. पण सरकारने प्रवाशांची व्यवस्थाच न केल्याने या ट्रेन स्टेशनवरच उभ्या असून रिकाम्याच परतत आहेत. महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १४५ पैकी ८५ ट्रेन सुटणं अपेक्षित होतं. पण फक्त २७ ट्रेनच सुटू शकल्या. महाराष्ट्र सरकारची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांना हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे. गरीब मजुरांना आपल्या घरी जाण्यासाठी मदत करावी, अशी सरकारला विनंती आहे, असा आरोप पियुष गोयल यांनी केला.

त्याला प्रतिउत्तर देताना नवाब मलिक म्हणाले, मागच्या २ दिवसांपासून रेल्वेमंत्री राजकारण करत आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून (एलटीटी) ४९ रेल्वे गाड्या सोडण्यात येतील, असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्या गाड्यांच्या हिशोबानं तिथं प्रवासी जमा देखील झाले. पण विभागीय रेल्वे व्यवस्थापक १६ गाड्यांपेक्षा जास्त गाड्या आम्ही सोडणार नाही, असं सांगत आहेत. प्रवाशांना तासनतास उभं राहावं लागलं, जी गर्दी झाली त्याला पियूष गोयल जबाबदार आहेत. त्यांनी हे घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवावेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

हेही वाचा - उद्धवजी फक्त यादी द्या, उद्यापासून १२५ ट्रेन सोडतो- पियुष गोयल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा