Advertisement

उद्धवजी फक्त यादी द्या, उद्यापासून १२५ ट्रेन सोडतो- पियुष गोयल

उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मजुरांची यादी द्यावी, महाराष्ट्रासाठी रोज १२५ ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे, असं थेट आव्हानच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

उद्धवजी फक्त यादी द्या, उद्यापासून १२५ ट्रेन सोडतो- पियुष गोयल
SHARES
Advertisement

परप्रांतीय मजुरांना (Migrant workers) त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्यासाठी आपण दररोज ८० विशेष ट्रेन सोडण्याची मागणी करूनही रेल्वेकडून निम्म्या म्हणजेच फक्त ४० ट्रेन मिळत असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २४ मे रोजी जनतेशी संवाद साधताना सांगितलं होतं. हे वक्तव्य खुपल्याने उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे मजुरांची यादी द्यावी, महाराष्ट्रासाठी रोज १२५ ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे, असं थेट आव्हानच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. 

सांगा किती ट्रेन हव्यात?

मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना पियुष गोयल (railway minister piyush goel) म्हणाले, उद्धव जी, आशा आहे की तुम्ही निरोगी आहात. तुम्हाला चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छा. उद्या आम्ही महाराष्ट्रातून १२५ श्रमिक विशेष ट्रेन (indian railway ready to give 125 shramik special train to maharashtra) पुरवण्यास तयार आहोत. तुमच्याकडे कामगारांची यादी तयार असल्याचं तुम्ही म्हणाला होता. त्यानुसार तुम्हाला विनंती आहे की सर्व आवश्यक माहिती जसं ट्रेन कुठून धावेल, प्रवाशांची यादी, त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट, ट्रेन कुठे जाईल, इत्यादी माहिती पुढच्या तासाभरात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे सुपूर्द करा, जेणेकरून आम्हाला ट्रेनची व्यवस्था करता येईल. जेणेकरून ट्रेन स्टेशनवरूनच रिकामी परतणार नाही. मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्हाला पाहिजे तेवढ्या ट्रेन मिळतील.

हेही वाचा- परप्रांतीय परत जाताहेत, येत्या १५ दिवसांत देशाचं खरं चित्र समोर येईल- उद्धव ठाकरे

परंतु तासाभरातच्या आत महाराष्ट्राकडून मजुरांची यादी न मिळाल्यानंतर पियुष गोयल यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं. टीव्हीच्या माध्यमातून कळलं की महाराष्ट्र सरकारने २०० ट्रेनची यादी रेल्वेला दिल्याचा दावा केला आहे. परंतु उद्या कुठल्या ट्रेन चालवायच्या यासंदर्भात प्रवाशाची यादी अजूनही मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना मिळालेली नाही. 

तब्बल १.५ तास उलटूनही महाराष्ट्र सरकारकडून १२५ ट्रेनसाठी प्रवाशांची यादी मिळू शकलेली नाही. ट्रेनची व्यवस्था करण्यासाठी वेळ लागतो. ट्रेन प्लॅटफाॅर्मवर येऊन उभ्या राहाव्यात अशी आमची इच्छा नाही, तेव्हा विशेष श्रमिक ट्रेन चालवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा, असा टोमणाही पियुष गोयल यांनी सरकारला मारला.   

परिस्थिती बिघडल्यावर

याआधी, फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातून परराज्यात जात असलेल्या परप्रांतीय मजुरांबाबतची (migrant workers) माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना संकटाच्या (covid-19) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व परप्रांतीय मजुरांना आहात तिथेच राहा असं आवाहन केलं, त्यांच्या खाण्यापिण्याची, निवासाची, आरोग्याची सर्व सुविधा केली. परंतु सरकारचा न ऐकता हे परप्रांतीय आपापल्या कुटुंबकबिल्याला घेऊन मिळेल त्या मार्गाने घरी जाण्यासाठी निघाले. या मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडा अशी मागणी आपण सातत्याने केंद्र सरकारकडे करत होतो. परंतु परिस्थिती बिकट झाल्यानंतर केंद्राने ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

६ लाख मजुरांना सोडलं

केंद्राने रेल्वेची सोय केल्यानंतर परप्रांतीयांच्या तिकीटासाठी ८५% रक्कम जाहीर केली. ही तिकीटाची रक्कम अजून राज्य सरकारला मिळायची आहे. जसे केंद्राचे इतर पैसे मिळाले, तसे हेही मिळतील. पण राज्य सरकारने या मजुरांना त्यांच्या राज्यात नेऊन सोडण्यासाठी आतापर्यंत ४८१ ट्रेन्स सोडल्या आहेत. तर तब्बल ८५ कोटी रुपये ट्रेनच्या भाड्यापोटी दिले आहेत. यातून आजपर्यंत ६-७ लाख प्रवासी मजुरांना आपण त्यांच्या राज्यात पोहोचवलं आहे. या मजुरांच्या संख्येकडे पाहता दिवसाला किमान ८० ट्रेन सोडण्याची परवानगी आपण मागितली आहे, परंतु अद्याप दिवसाला ४० ट्रेनच सोडल्या जात आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. 

संबंधित विषय
Advertisement