Advertisement

विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करणार- मुख्यमंत्री

आधी देशांतर्गत विमान वाहतुकीस नकार देणाऱ्या महाराष्ट्राने अखेर महाराष्ट्रातील विमानतळं खुली करण्यास सहमती दर्शवली आहे.

विमान वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करणार- मुख्यमंत्री
SHARES

आधी देशांतर्गत विमान वाहतुकीस नकार देणाऱ्या महाराष्ट्राने अखेर महाराष्ट्रातील विमानतळं खुली करण्यास सहमती दर्शवली आहे. केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंग पुरी (civil aviation minister hardeep singh puri) यांच्यासोबतच झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने विमान वाहतूक (aviation in maharashtra) सुरू करणार असल्याची माहिती रविवार २४ मे २०२० रोजी दिली.

विमानतळं रेड झोनमध्ये

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील २५ मार्चपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा (domestic airline) तब्बल २ महिन्यांनी म्हणजेच सोमवार २५ मे २०२० पासून सुरू होत आहे. परंतु महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद अशी चारही महत्त्वाची विमानतळं रेड झोनमध्ये (red zone) येत आहेत. अशा स्थितीत विमानतळावर (airport) उतरणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आणि इतर सुविधा देण्याची व्यवस्था या परिस्थितीत करणं शक्य नसल्याचं म्हणत महाराष्ट्राने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास नकार दिला होता. 

हेही वाचा - राज्यातली चारही विमानतळंं रेड झोनमध्ये, विमानसेवा सुरू करण्यास महाराष्ट्राचा ठाम नकार

कमीत कमी प्रमाणात

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या चर्चेत त्यांनी जोपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण (MIAL) पूर्ण सक्षमपणे सेवा सुरू करण्यास तयार होत नाही (Maharashtra government will initiated minimum operation of domestic flights restricting it to the medical emergencies, transferring of international passengers and students), तोपर्यंत प्राधान्यक्रमानुसार परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात पोहोचवणे, वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, विद्यार्थी आणि इतर अपवादात्मक स्थितीत कमीत कमी स्वरूपात मुंबई विमानतळावरून विमानांच्या उड्डाणास परवानगी देता येईल, अशी भूमिका स्पष्ट केली. 

धोका वाढेल

दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  रेड झोन मधील  विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणं अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांच्या नुसत्या थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणं शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणं हे चुकीचं आहे. ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोकाही वाढेलच, असं मत मांडलं आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा