Advertisement

राज्यातली चारही विमानतळंं रेड झोनमध्ये, विमानसेवा सुरू करण्यास महाराष्ट्राचा ठाम नकार

महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) तूर्तास तरी विमानसेवा सुरू करण्याला विरोध करत केंद्र सरकारला धक्का दिला आहे.

राज्यातली चारही विमानतळंं रेड झोनमध्ये, विमानसेवा सुरू करण्यास महाराष्ट्राचा ठाम नकार
SHARES

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मागील २५ मार्चपासून बंद असलेली देशांतर्गत विमानसेवा (domestic airline) तब्बल २ महिन्यांनी म्हणजेच सोमवार २५ मे २०२० पासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. असं असलं, तरी विमानतळावर (airport) उतरणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आणि इतर सुविधा देण्याची व्यवस्था या परिस्थितीत करणं शक्य नाही, असं म्हणत महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) तूर्तास तरी विमानसेवा सुरू करण्याला विरोध करत केंद्र सरकारला धक्का दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लाॅकडाऊन सुरू असेपर्यंत म्हणजेच ३१ मे पर्यंत तरी विमानसेवा सुरू होण्याची शक्यता नाही. 

इतर राज्यांचाही नकार

केवळ महाराष्ट्र राज्यच नाही, तर पंजाब, छत्तीसगड,तेलंगणा, आंध्रप्रदेश सरकारने देखील इतरांना सोशल डिस्टन्सिंग सक्तीचं असताना केवळ विमान प्रवाशांना सूट देणं शक्य नाही, असं म्हणत देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तर कोरोना संकटात केवळ आपत्कालीन विमानसेवा आणि कनेक्टिव विमानसेवेला मंजुरी देता येईल, असंही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. 

केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री हरदीपसिंह पुरी (civil aviation minister hardeep sing puri) यांनी बुधवारी ट्विट करून देशांतर्गत नागरी उड्डाणसेवा टप्प्या टप्प्याने सुरू होत असून त्यासाठी सर्व विमानतळांनी सज्ज राहावं, अशी घोषणा केली होती. किमान प्रवासी, सुरक्षित वावर निश्चित करण्यासाठी मधले आसन रिक्त ठेवणे, मास्क लावण्याची अनिवार्यता अशा नियमांसह देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्याचे संकेत पुरी यांनी दिले होते. 

हेही वाचा - देशांतर्गत विमान प्रवासासाठी ‘हे’ आहेत नियम

धोका वाढवणं चुकीचं

त्यावर पहिल्यांदाच राज्य सरकारकडून उघड प्रतिक्रिया आली आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत की, रेड झोन मधील  विमानतळ अशा परिस्थितीमध्ये सुरू करणं अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांच्या नुसत्या थर्मल स्कॅनिंगचा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणं शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोनमध्ये आणून तेथील धोका वाढविणं हे चुकीचं आहे. ग्रीन झोन मधील प्रवाशांना रेड झोन मध्ये आणून संसर्ग/ प्रादुर्भावाचा धोका का वाढवायचा? व्यस्त विमानतळांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सावधगिरीने चालविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे, त्यामुळे आपोआपच धोकाही वाढेलच, असं मत देशमुख यांनी मांडलं आहे.

विमानतळं रेड झोनमध्ये

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद  ही चारही महत्वाची विमानतळं रेड झोनमध्ये मोडतात. या चारही शहरांतील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शिवाय या शहरांतमध्ये टॅक्सी, रिक्षा, बस सेवा बंद आहे. देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्यास ३३ टक्के क्षमतेनुसार दिवसाला १५० विमानांचं उड्डाण होईल, अशा स्थितीत बाहेरून या शहरांत दाखल होणाऱ्या प्रवाशांमुळे यंत्रणेवर अधिक ताण पडेल, त्यासाठी सध्या तरी यासाठी राज्य सरकारची तयारी नाही. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा