Advertisement

देशांतर्गत विमान प्रवासासाठी ‘हे’ आहेत नियम

देशात सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. विमान प्रवासाचे नियम गुरुवारी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहेत.

देशांतर्गत विमान प्रवासासाठी ‘हे’ आहेत नियम
SHARES

देशात सोमवारपासून टप्प्याटप्प्याने देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. विमान प्रवासाचे नियम गुरुवारी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जारी केले आहेत.  प्रवाशांना या नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे प्रवास करताना तुमच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणं अत्यंत आवश्यक आहे. 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आरोग्यसेतू आवश्यक नाही आहे. . याशिवाय काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

 हे आहेत नियम 

  • विमान उड्डाण वेळेच्या दोन तास आधी प्रवाशांना विमानतळावर पोहोचावं लागेल.
  • प्रवाशांना मास्क आणि ग्लोव्हज घालणं बंधनकारक 
  • पुढच्या चार तासांनी ज्यांचे विमान आहे, त्यांनाच फक्त टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश दिला जाणार
  • टर्मिनल बिल्डींगमध्ये प्रवेश देण्याआधी प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग चाचणी करण्यात येणार
  • १४ वर्ष वयोगटाच्या आतील मुलांसाठी आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक नाही. ज्यांच्या अ‍ॅपवर हिरवं चिन्ह येणार नाही, त्यांना एअर पोर्टवर प्रवेश मिळणार नाही.
  • शक्यतो ट्रॉलीचा वापर टाळण्याचा प्रयत्न असेल. पण विनंती केल्यास ट्रॉली उपलब्ध करुन दिली जाऊ शकते.
  • टर्मिनलमध्ये प्रवेश करण्याआधी सामानाचं सॅनिटायझेशन केलं जाणार
  • काऊंटरवरील स्टाफला फेस शिल्ड घालावे लागेल किंवा काच मध्ये आवश्यक आहे.
  • सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांबद्दल सातत्याने घोषणा केल्या जातील.
  • एअरपोर्ट स्टाफला पीपीई किट बंधनकारक आहे तसेच कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सॅनिटायझर ठेवावे लागेल.            

हेही वाचा -
खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई
नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा