Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर

येत्या १ जूनपासून देशभरात २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत.

नॉन एसी ट्रेनसाठी ऑनलाइन बुकिंगची वेळ जाहीर
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या १ जूनपासून देशभरात २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत. या रेल्वे गाड्यांसाठी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग सुरु करण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कोणार्क एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्स्प्रेस १ जूनपासून सुटणार असून, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून दरभंगा एक्स्प्रेस, कामयानी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, तर वांद्रे टर्मिनसहून सूर्यनगरी एक्स्प्रेस, अवध एक्स्प्रेस या ट्रेन सुटणार आहेत. 

या रेल्वे गाड्यांसाठी ऑनलाइन बुकिंग सुरु झालं आहे. प्रवाशांच्या माहितीकरीता पीआयबीच्या वेबसाईटवर १०० ट्रेनची यादी जाहीर करण्यात आली आहे. आयआरसीटीसी वेबसाइट किंवा मोबाइल अॅपद्वारे ई-तिकीट दिले जाणार आहे. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण काऊंटरवर तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. 

ट्रेनमध्ये कोणताही अनारक्षित कोच राहणार नसल्यानं तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार असल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे. ट्रेन तिकिटाचे दर नेहमीप्रमाणे असणार आहेत. जनरल कोचही राखीव असल्यानं सेकंड सीटिंग (२ एस) भाडं आकारलं जाणार असून, सर्व प्रवाशांना सीट दिली जाणार आहे. आगाऊ आरक्षण कालावधी हा जास्तीत जास्त ३० दिवस असणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये दिव्यांग आणि ११ प्रकारच्या रुग्णांना सवलती मिळणार आहे.हेही वाचा -

घाटकोपर, मुलुंड, भांडुपमध्ये चिंता वाढली, रुग्णदुपटीचा कालावधी घटला

'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधनRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा