Advertisement

खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई

खाजगी दवाखान्यांवर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

खासगी नर्सिंग होम, रुग्णालय सुरू न केल्यास होणार कारवाई
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशी परिस्थिती असतानाही मुंबईतील अनेक खाजगी दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. हे दवाखाने बंद असल्यानं इतर आजराच्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळं या खाजगी दवाखान्यांवर पोलिसात गुन्हे नोंदविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

महापालिका क्षेत्रातील खासगी नर्सिंग होम व खासगी रुग्णालये सुरू ठेवण्याचे आदेश महापालिकेद्वारे यापूर्वी वारंवार देण्यात आले आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी अद्याप काही नर्सिंग होम, हॉस्पिटल व खासगी रुग्णालये बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र आता जी खासगी रुग्णालये, नर्सिंग होम सुरू होतील, त्यांना महापालिकेद्वारे 'पीपीई किट' देण्याचेही निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मागील २ महिन्यांत महापालिका क्षेत्रातील जे खासगी रुग्णालये, नर्सिंग होम, खासगी दवाखाने बंद आढळून आले. त्यांना सुरू करण्याची विनंती करण्यात आली होती. यानंतर याबाबत वारंवार सूचना व नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. नोटीस देण्याच्या कार्यवाहीनंतर महापालिका क्षेत्रातील काही खासगी नर्सिंग होम, खासगी रुग्णालये व काही खासगी रुग्णालये सुरू झाली. 

सुरू झालेल्या या खासगी रुग्णालयांना महापालिकेद्वारे 'पीपीई किट' देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांची गरज आणि परिस्थिती लक्षात न घेता बंद ठेवण्यात येत असलेल्या या खासगी रुग्णालयांवर, खासगी हॉस्पिटलवर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. 

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, सर्व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या क्षेत्रातील बंद असलेली खासगी रुग्णालये, खासगी नर्सिंग होम व खाजगी क्लिनिक यांची यादी करावी व त्यांच्यावर पोलिसात गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.



हेही वाचा -

घाटकोपर, मुलुंड, भांडुपमध्ये चिंता वाढली, रुग्णदुपटीचा कालावधी घटला

'नवरी नटली' फेम लोककलावंत छगन चौगुले यांचं कोरोनामुळे निधन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा