
राहुल गांधी यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी देखील वोट चोरीचा बॉम्ब फोडला आहे. वरळीत 19 हजार 333 मतदारांचा घोळ आहे. तसेच निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
ठाकरे सेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी एक एक मुद्दे मांडत कथित मतदारयादीतील घोळ सांगितला.
आदित्य ठाकरे म्हणाले, 'आपण प्रत्येकाला सांगत असतो की, यादींचं वाचन झालं पाहिजे. आतापर्यंत किती शाखेत यादींचं वाचन झालं आहे, वरळीचं उदाहरण देत आहे. तुम्ही मतचोरी पकडली, तुम्ही चूक पकडली नाही, तर बोगस सरकार डोक्यावर बसेल. आता तुम्ही ठरवायचं आहे की, तुम्ही मतचोरी पकडायची आहे की नाही. वरळीत लोकसभेत 2, 52, 970 मते होती. त्यानंतर विधानसभेत ही मते 2, 63, 352 इतकी झाली. आपण नैसर्गिक वाढ झाली, असे समजू शकतो.
'वरळीत आतापर्यंत 16,043 मतांची वाढ झाली. तर 5,661 मते आहेत. मतदारयादीचा अभ्यास केला. वाढलेले मतदार पाहिले तर, त्यात 19,333 मतदारांमध्ये गडबड दिसून आली. फोटो भूरकट केले आहेत. यातील नरहरी कुलकर्णी नावाच्या व्यक्तीचा लोकसभेत मृत्यू झाला होता. विधानसभेत त्यांनी येऊन मतदान केलं. यामुळे याबाबत चौकशी देखील केली. मतदान केल्यानंतर या माणसाला यादीतून काढलं आहे. हे पहिलं उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.
'निवडणुकीत तुमची जबाबदारी म्हणजे मतदारयादी आहे. आता 1200 लोकांची मतदारयादी असणार आहे. या यादीचा अभ्यास करायला लागणार आहे.
आतापर्यंत अनेक तंत्रज्ञान वापरून सर्व पकडू शकलो नाही. निवडणूक आयोगाकडे एक सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर फोटोच्या चुका पकडतं. ते किती याद्यांमध्ये आहे, हे आपल्याला यादी वाचूनच कळतं. तुम्ही पोलिंग एजंट बसला. त्यावेळी तुम्ही काय पाहाल.
एका फोटोमध्ये फक्त नाक दाखवलं आहे. तुम्हाला फोटो ओळखता आला पाहिजे. वरळीतील गडबड असणाऱ्या मतदारांची संख्या 22 ते 23 हजार असू शकते. हा कमीत कमी आकडा वाटतोय. अजून यादीचं वाचन सुरु आहे. फोटो नसेल तर मतदाराला कसं ओळखणार, याकडेही तु्मचं लक्ष असलं पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केलं .
हेही वाचा
