Advertisement

अवकाळी पावसामुळे तापमानात घट

मुंबईत नोव्हेंबरमध्ये गेल्या 10 वर्षांहून अधिक काळातील सर्वात थंड दिवस नोंदवला गेला.

अवकाळी पावसामुळे तापमानात घट
SHARES

रविवार, 2 नोव्हेंबरला मुंबईकरांची सकाळ गारव्याने झाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे तापमानात घसरण नोंदवली गेली. 

मुंबईत तापमान २७°C तर उपनगरांत २९°C पर्यंत खाली घसरले. गेल्या दहा वर्षांतील मुंबईचा सर्वात थंड नोव्हेंबर दिवस ठरला.

शनिवारी सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर अधूनमधून कोसळत राहिला. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) माहितीनुसार, शनिवारी रात्रीपर्यंत कोलाब्यात 5.4 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 1.5 मिमी पाऊस झाला. रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत पाऊस वाढला. 8:30 ते 5:30 या वेळेत कोलाब्यात २६ मिमी आणि सांताक्रूझमध्ये २४ मिमी पावसाची नोंद झाली.

या सततच्या पावसामुळे तापमान सरासरीपेक्षा बरेच कमी राहिले. नोव्हेंबरमध्ये साधारण 35°C तापमान असणाऱ्या सांताक्रूझमध्ये कमाल तापमान फक्त २९°C, म्हणजेच सरासरीपेक्षा ५.७°C कमी होते. तर कोलाब्यात तापमान २७°C — नेहमीपेक्षा ७.३°C कमी.

हवामान खात्यानुसार, हा दिवस गेल्या किमान 11 वर्षांतील सर्वात थंड नोव्हेंबर दिवस होता. गेल्या वर्षी सांताक्रूझमध्ये कमाल तापमान 32.6°C आणि कोलाब्यात 30.8°C होते. 2014पर्यंत नोव्हेंबरमध्ये दिवसा तापमान 30°C खाली जाणे जवळपास अशक्य होते. अलिकडच्या वर्षांत सुद्धा किमान नोंद 29.2°C होती

पावसामुळे गारठा वाढला आहे. पण हवेची गुणवत्ता देखील लक्षणीय सुधारली आहे. दिवाळीनंतर AQI 212 (Poor) होता, जो रविवारी 56 वर आला. CPCBच्या आकडेवारीनुसार बहुतांश भागांत AQI 100 च्या खाली नोंदला गेला. कोलाबा होता सर्वात स्वच्छ हवा असलेला भाग — AQI 34, त्यापाठोपाठ भायखळा 38.



हेही वाचा

मुंबईत चार नवीन ठिकाणी दाणे टाकण्यास परवानगी

3 नोव्हेंबरपासून 21 दिवसांसाठी शहाड पूल बंद राहणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा