Advertisement

राज्यातलं सरकार पूर्णपणे स्थिर- नवाब मलिक

हे सरकार स्थिर असून सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल, यांत कुठलीही शंका नाही, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं

राज्यातलं सरकार पूर्णपणे स्थिर- नवाब मलिक
SHARES
Advertisement

महाविकास आघाडीचं सरकार पूर्णपणे स्थिर तसंच मजबूत असून हे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ नक्की पूर्ण करेल (maha vikas aghadi government will complite 5 year term says ncp leader nawab malik), अशा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सत्ता हाती घेऊन नुकतेच ६ महिने पूर्ण केले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचं मिळून सरकार सत्तेत आलं होतं. सुरूवातीला प्रत्येकी दोन-दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी नंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. 

हेही वाचा - राज्यातलं सरकार अस्थिर करण्यात भाजपला रस नाही, ते अंतर्विरोधातूनच पडेल- देवेंद्र फडणवीस

सरकारमध्ये एकमत

यासंदर्भात नवाब मलिक यांना विचारलं असता ते म्हणाले, वेगवेगळी विचारधारा असलेल्या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं ही बाब भाजपला अजूनही पचलेली नाही. परंतु हे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे एकविचाराने चालणारं सरकार आहे. लोकांच्या भल्यासाठी काम करणारं सरकार आहे. भाजपकडून सरकारच्या स्थिरतेवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले, यापुढंही करण्यात येतील. परंतु सरकारने विधीमंडळात आपलं बहुमत सिद्ध केलेलं असल्याने घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. भाजपकडे दुर्लक्ष करून आम्ही यापुढेही वाटचाल करत राहू. हे सरकार स्थिर असून सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल, यांत कुठलीही शंका नाही, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रपती राजवटीची मागणी

काही दिवसांपूर्वीच भाजपचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं असून राज्यातील सरकारला हटवून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली होती.

कोरोनाच्या संकटातही भाजप राजकारण करत असल्याची टीका होऊ लागल्यावर सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. ते स्वत:च्या अंतर्विरोधातून पडेल. कोरोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळविण्यासाठी आघाडी सरकारकडूनच अशा बातम्या दिल्या जात आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

हेही वाचा - रेल्वे मंत्रालय महाराष्ट्रासोबत रडीचा डाव खेळतंय, अनिल परब यांचा आरोप

संबंधित विषय
Advertisement