कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो: मुंबई आणि बदलापूर दरम्यानचे अंतर कमी होणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह (mumbai) ठाणे (thane), कल्याण, मीरा-भाईंदरपर्यंत मेट्रोचं जाळ पसरलं आहे. आता लवकरच कांजूरमार्ग ते बदलापूरपर्यंत मेट्रो (metro) धावणार आहे. 38 किमी लांबीच्या मेट्रो लाईन 14 सुरू होणार असल्याची माहिती आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA हा प्रकल्प उभारणार आहे. याचं बांधकाम एका वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि बदलापूर दरम्यान प्रवास करण्यासाठी सध्या दीड ते 2 तास लागतात. मात्र आता नवीन मेट्रो लाईन -14 मुळे मुंबई ते बदलापूर या प्रवासाचा वेळ वाचणार असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास मुंबई - बदलापूर (badlapur) हे अंतर एक तास किंवा त्यापेक्षा कमी होण्याची अपेक्षा आहे.

कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो दोन भागात -

- कांजूरमार्ग ते घणसोली हा भूमिगत भाग

- घणसोली ते बदलापूर हा एलिवेटेड भाग

मेट्रो लाईन 14 च्या मूळ आराखड्यात पारसिक हिल्स आणि ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य यासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांजवळील अनेक क्षेत्र आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना ही परिस्थिती अतिशय सावधपणे पाहावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना विशेष परवानगी घ्यावी लागेल.

हे बांधकाम करताना मेट्रो लाईनच्या बांधकामामुळे पर्यावरणाला किंवा तेथील प्राण्यांना आणि वनस्पतींना हानी पोहोचणार नाही या काळजी करणं गरजेचं आहे.

कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईनच्या प्रकल्पासाठी एकूण खर्च 18,000 कोटी रुपये असल्याचा वर्तवण्यात आला आहे. मिलान मेट्रो या सल्लागार कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. आयआयटी मुंबईने  त्याला मान्यता दिली आहे.

मात्र यासाठी सरकारची मान्यता असणंही गरजेचं आहे. अंतिम मंजुरीसाठी हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करणं आवश्यक आहे. हा प्रकल्प मुंबईच्या 337 किमी लांबीच्या मोठ्या मेट्रो विस्तार योजनेचा एक भाग आहे, शहर आणि उपनगरांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारणं हा या मेट्रो लाईनचा उद्देश आहे.


हेही वाचा

झाडांच्या फांद्या छाटणीकडे दुर्लक्ष झाल्यास मालमत्ता कर आकारणार

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या