हिंदमाता पुलाखालील रुग्णांची महापौरांकडून वांद्र्यात व्यवस्था

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील जवळपास ५० रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हिंदमाता पुलाखाली हलवण्यात आलं होतं. मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळं महापालिका रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेनं हा निर्णय घेतला होता. परंतु, आता मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी हिंदमाता पुलाखालील त्या रुग्णांना वांद्र्यातील उत्तर भारतीय सभागृहात दाखल करण्याचा निर्णय घेतला.

टाटा कॅंसर हॉस्पिटल आणि केईएम रुग्णालयातील रुग्णांची उड्डाणपुलाखालील तात्पुरत्या जागेची व्यवस्था करण्यात आली असून, या रुग्णांना पालिकेकडून दिवसातून दोनदा जेवण उपलब्ध करुन दिलं जात होत. मुंबईबाहेरुन हॉस्पिटलला आलेल्या मात्र लॉकडाऊनमुळं अडकलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मुंबईच्या हिंदमाता पुलाखाली सोय करण्यात आली होती. मात्र त्यांचे हाल होत असल्याचा आरोप केला जात होता. तिथे ना पोलिसांची गस्त होती, ना पुरेशा डॉक्टर-नर्सची सुविधा. विशेष म्हणजे, केमोथेरपीचे रुग्णही पुलाखाली निपचित पडले होते.

नाश्त्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकंच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परळ भाग हा मुंबईच्या हॉटस्पॉट परिसरापैकी एक असल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी रुग्णांची विचारपूस केली असून, ‘कोविड 19’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेनं कठोर निर्णय घेतल्याचा दावा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला.


हेही वाचा -

Coronavirus Updates: मुख्यमंत्री सहायता निधीत १९७ कोटी जमा

Coronavirus Update: दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द


पुढील बातमी
इतर बातम्या