खारघरचं सेंट्रल पार्क अखेर बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पनवेल महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. पालिका हद्दीतील खारघरमध्ये रूग्णसंख्या वाढण्याचं प्रमाण अधिक आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी घेतला आहे. 

खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये अनेक नागरिक गर्दी करत असल्याचं दिसून आलं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्याचंही समोर आलं आहे.  सेंट्रल पार्क येथे मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर होत नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढू शकतो.  हे टाळण्यासाठी सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले आहेत.

पनवेल पालिका क्षेत्रात खारघर शहरात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ कळंबोली आणि नवीन पनवेलचा नंबर लागतो.  सेंट्रल पार्क हे सुमारे १०० एकर परिसरात पसरलेले भव्य उद्यान आहे. या ठिकाणी रोज नवी मुंबई, कामोठे, कळंबोली येथील नागरिक मोठय़ा संख्येने भेट देत असतात. येथे अनेक गाड्यांना पार्किंग करण्यासाठीही जागा मिळत नाही. कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी सेंट्रल पार्क  पुढील आदेशापर्यंत बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 



हेही वाचा -

रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित - राजेश टोपे

“तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी बघतो”, शिवसेना खासदाराने धमकावल्याचा नवनीत राणांचा आरोप

पुढील बातमी
इतर बातम्या