Advertisement

रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित - राजेश टोपे

लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे. अजून २-४ दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

रुग्णसंख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन निश्चित - राजेश टोपे
SHARES

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक येथे रोज कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येन आढळत आहेत.  रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर राज्यात लॉकडाऊन निश्चित आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच लवकरच लॉकडाऊनबाबात निर्णय घेतला जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. 

पुण्यात बोलताना राजेश टोपे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून सुरु असलेली रुग्णवाढ कायम राहिली तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन आणि अजून कठोर निर्बंध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही.

लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.  अजून २-४ दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत कुठलीही लपवाछपवी होत नाही. इतर राज्यात बहुदा आकडे लवपले जात असतील, अशी शंका टोपे यांनी व्यक्त केली आहे. कारण काही राज्यात निवडणूक होत आहे. मोठ्या सभा होत आहेत. पण तिथली रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मोठं राज्य आहे. महाराष्ट्रात साडे बारा कोटी लोक राहतात. त्यामुळे तुलना करायची झाल्यास रुग्णसंख्येत महाराष्ट्राच्या पुढेही काही राज्य असल्याचं टोपे म्हणाले.हेही वाचा -

  1. २४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन

  2. धारावीत मार्च महिन्यात ६२ टक्के रुग्ण वाढले

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा