Advertisement

२४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन

जीवनशैली व कार्यालयीन वेळा लक्षात घेता, खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी केल्यास अधिकाधिक नागरिकांना लस घेणं शक्य होणार आहे.

२४ तास लसीकरणाचा पर्याय महापालिकेच्या विचाराधीन
SHARES

जीवनशैली व कार्यालयीन वेळा लक्षात घेता, खासगी रुग्णालयांनी लसीकरणाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी केल्यास अधिकाधिक नागरिकांना लस घेणं शक्य होणार आहे. शक्य असल्यास आणि पुरेशी व्यवस्था करणं शक्य असेल तर २४ तास लसीकरणाची सोय करण्याचाही पर्याय विचारात घ्यावा, असे निर्देश महापालिकेनं दिले आहेत.

कोविडशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींची परिणामकारकता सारखीच असून, नागरिकांनी चिंता बाळगण्याचं कारण नाही. मुंबईत महापालिकेच्या २४ व शासकीय ८ अशा मिळून ३२ रुग्णालयात दररोज ४१ हजार जणांना लस दिली जाते. खासगी रुग्णालयांत ४ हजार जणांना दररोज लस दिली जाते. खासगी रुग्णालयांत लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.

दररोज १ लाख नागरिकांना लस देण्याचं उद्दिष्ट असून, खासगी रुग्णालयानं रोज १ हजार जणांचं लसीकरण करावं, असे निर्देश मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले असतानाच लसीकरणासाठी निर्देशित खासगी रुग्णालयांची संख्या ५९ वरून ८० पर्यंत नेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यानंतर रोज १ लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट आहे. यासाठी नगरसेवकांसह सामाजिक, सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

दिवसाला ५० हजार कोरोना चाचण्या

रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबईतील दैनंदिन चाचण्यांची संख्या २५ हजारांवरून टप्प्याटप्प्याने ५० हजारांवर नेण्याचे लक्ष्य आहे.

लसीकरणाचे जास्त बुथ, पुरेशी जागा, पिण्याचे पाणी, चहा-कॉफी, बैठक व्यवस्था, पुरेसा कर्मचारी वर्ग, पहिल्या व दुस-या डोससाठी स्वतंत्र कक्ष.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा