
मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत आतापर्यंत एकूण 6 हजार 922 मालमत्तांवर अटकावणी तर 483 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
तसेच एकूण 210 मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित आहे. दरम्यान, जप्तीची कारवाई सुरू होताच एकूण 2 हजार 888 मालमत्ताधारकांनी करभरणा केला आहे.
तथापि, अद्यापही मालमत्ता करभरणा केले नसल्यास दिनांक 31 मार्च 2026 पूर्वी मालमत्ता कर भरावे. अन्यथा, दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीत करभरणा करुन महानगरपालिका (brihanmumbai municipal corporation) प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी केले आहे.
बृहन्मुंबई (mumbai) महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत आतापर्यंत जमा झालेला मालमत्ता कर (property tax) आणि थकबाकी याचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
10 मार्च 2026 पर्यंत एकूण 6 हजार 24 कोटी रुपयांचा म्हणजे 82.05 टक्के मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे.
आतापर्यंत 82.05 टक्के मालमत्ता कर संकलित झाले असले तरी 31 मार्च 2026 पर्यंत 100 टक्के कर संकलित होणे अपेक्षित आहे.
यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत. थकीत मालमत्ताधारकांविरोधात तात्काळ जप्तीची कारवाई करावी तसेच जप्त केलेल्या मालमत्तेच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी.
जप्त केलेली मालमत्ता करभरणा न करता पुन्हा वापरात आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित मालमत्ताधारकावर पोलिसांत गुन्हा नोंदवावा, असे स्पष्ट निर्देशही डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा
