RT-PCR चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट कसा प्री-बुक कराल?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ओमिक्रॉनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रानं मंगळवारी 'जोखीम असलेल्या' देशांतून येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या प्री-बुक करणे बंधनकारक केलं आहे.

एका अधिसूचनेत, नागरी उड्डाण मंत्रालयानं म्हटलं आहे की, 'जोखीम असलेल्या' देशांतील सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद येथील विमानतळांवर येणा-या प्रवाशांना अनिवार्यपणे आरटी-पीसीआर चाचणीची प्रीबुकिंग करावी लागेल.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 'जोखीम' देशांच्या यादीत यूकेसह युरोपियन राष्ट्रांचा समावेश आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोत्सवाना, चीन, घाना, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, टांझानिया, हाँगकाँग आणि इस्रायल या देशांचाही समावेश आहे. पाहूया RT-PCR चाचणी कशी प्री-बुक करायची.

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर RT-PCR चाचणीसाठी ऑनलाइन स्लॉट कसे प्री-बुक करू शकतात ते पाहा.

  •  www.newdelhiairport.in ला भेट द्या. त्यानंतर वरच्या पॅनेलवर ‘कोविड-१९ चाचणी बुक करा’ हे शोधा.
  • त्यानंतर पुढे, प्रवासाचा प्रकार निवडा (या प्रकरणात, आंतरराष्ट्रीय आगमन).
  • नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार कार्ड/पासपोर्ट क्रमांक, पत्ता, भेटीची तारीख, वेळ स्लॉट इत्यादी सर्व वैयक्तिक तपशील भरा.
  • सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, चाचणीचा प्रकार निवडा (या प्रकरणात, RT-PCR, रॅपिड पीसीआर चाचणी देखील उपलब्ध आहे.)
  • स्क्रीनवर दाखवलेल्या सूचनांचे अनुसरण करा आणि विमानतळावर आगमन झाल्यावर तुमच्या RT-PCR चाचणीसाठी एक स्लॉट बुक करा.
  • RT-PCR चाचणीसाठी, प्रवाशाला ५०० रुपये द्यावे लागतील, तर दुसरीकडे, रॅपिड PCR चाचणीची किंमत ३,५०० आहे.
  • पूर्वीच्या बाबतीत, चाचणीचे निकाल ६-८ तासांत उपलब्ध होतील, तर नंतरचा कालावधी फक्त ३० मिनिटे ते दीड तासाचा आहे.
  • IGI विमानतळावर किंवा त्यामार्गे प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी चाचणी सुविधा उपलब्ध आहे.
  • याव्यतिरिक्त, प्रवाशांना त्यांच्या भेटीची वेळ पुन्हा शेड्यूल करण्याचा किंवा बुकिंग पूर्णपणे रद्द करण्याचा पर्याय आहे.


हेही वाचा

विमानतळावर येणाऱ्यांना RT-PCR चाचणी प्रीबुक करणं बंधनकारक

मुंबईत ७ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची भर

पुढील बातमी
इतर बातम्या