Advertisement

मुंबईत ७ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची भर

राज्यात आज ८ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकीच ७ रुग्ण मुंबईतील आहेत.

मुंबईत ७ नव्या ओमिक्रॉन रुग्णांची भर
(Representational Image)
SHARES

राज्यात आज ८ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झालेली आहे. यापैक ७ रुग्ण मुंबईतील आणि एक रुग्ण वसई विरार इथला आहे. राज्यात आतापर्यंत २८ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी ९ जण रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहे.

दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात ६८४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६४ लाख ९३ हजार ६८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७२ टक्के आहे.

राज्यात आज २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ६ हजार ४८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात ७५ हजार ४९२ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर ८८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ८८ हजार ९९३ झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ७५ हजार ८८८ इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी ७ हजार ९९५ कोरोनाबाधित बरे झाले होते. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटी ४१ लाख ३८ हजार ७६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.



हेही वाचा

महापालिका सतर्क; 'करीना'-'अमृता'च्या इमारतीत कोविड-१९ टेस्टिंग कॅम्प

ऑमिक्रॉनला आळा घालण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट-२

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा