Advertisement

महापालिका सतर्क; 'करीना'-'अमृता'च्या इमारतीत कोविड-१९ टेस्टिंग कॅम्प

मंगळवारी करीना आणि अमृता अरोरा या दोघींच्याही इमारतीत महापालिकेकडून कोविड टेस्टिंग कॅम्प लावण्यात येणार आहेत.

महापालिका सतर्क; 'करीना'-'अमृता'च्या इमारतीत कोविड-१९ टेस्टिंग कॅम्प
SHARES

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि तिची मैत्रीण अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर महापालिका सतर्क झाली असून एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यानुसार, मंगळवारी करीना आणि अमृता अरोरा या दोघींच्याही इमारतीत महापालिकेकडून कोविड टेस्टिंग कॅम्प लावण्यात येणार आहेत.

महापालिकेचे वैद्यकीय पथक दोन्ही अभिनेत्रींच्या इमारतीत आरटी पीसीआर चाचणी करणार आहे. महापालिकेची टीम करीना आणि अमृता अरोरा यांच्या बिल्डिंग कंपाऊंड आणि इतर ठिकाणीही सानिटायझेशन करेल. चित्रपट निर्माता करण जोहरचे घरही सानिटाइझ केले जाईल. कारण पार्टी करणच्या घरी झाली होती. तेथून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला.

करीना खान कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये आहे. तसंच, महापालिका दररोज अभिनेत्रीच्या प्रकृतीचे अपडेट घेणार आहे.

करीना आणि अमृता अरोरा शिवाय महीप कपूर आणि सीमा खान यांनाही कोरोनाची लागण झाला आहे. चौघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. हे चौघेही एकाच गर्ल गँगमध्ये आहेत आणि सोबतच पार्टी अथवा गेट टुगेदर करतात. 

बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर महापालिका याबाबत खूप सावध झाली आहे. करीना कपूरच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले की ती आता बरी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात पहिले सीमा खानला कोरोनाची लागण झाली. ती गेल्या 8 डिसेंबरला करण जोहरच्या घरी गेट-टुगेदरसाठी गेली होती. या पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोराही उपस्थित होत्या.

'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. ११ डिसेंबर रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करीना खान आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी झाली. यात त्या दोघीही संक्रमित आढळल्या.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा