कोकण रेल्वेच्या (konkan railway) दुपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे. तब्बल 263 किलोमीटर लांब मार्गावर दुपदरीकरण, तीन नवीन रेल्वे स्थानक आणि अतिरिक्त लूप मार्गांचा विकास करण्याची योजना आहे.
यामुळे कोकण रेल्वेच्या विस्तारासह मुंबई (mumbai) ते कोकण (konkan) प्रवास अधिक वेगाने होणार आहे.
कोकण रेल्वेच्या विस्तारासाठी पाच वर्षीय प्लॅन तयार केला गेला आहे. यासाठी एकूण 470.08 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
रेल्वे बोर्डाकडे याचा प्रस्ताव पाठवला आहे अशी महिती कोकण रेल्वेचे संचालक आणि व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी 'मिड-डे'सोबत बोलताना दिली.
रायगड जिल्ह्यातील रोह्यापासून ते कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ठोकूरदरम्यान 740 किमी लांब मार्गावरील कोंडी फोडण्याच्या हेतूने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
ठोकूर ते मुकंबिका रोड-ब्यनदूर या मार्गावर 112 किमी तर वैभववाडी ते माजोर्डा या मार्गावर 151 किमी असं एकत्र 263 किलोमीटर मार्गावर दुपदरीकरण करण्यात येणार आहे.
रोहा-मडगाव पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 143 टक्के तर मडगाव ते ठोकूर पट्ट्यावर क्षमतेपेक्षा 128 टक्के अधिक प्रवासी प्रवास करतात असं नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात समोर आलं होतं.
त्यामुळे या मार्गाचं दुपदरीकरण करण्याची योजना तयार केली. या प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला आहे. जून 30 पर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर केवळ 54.66 किमी मार्गां दुपदरीकरण करण्यात आलं आहे.
मायेम, मुकांबिका रोड-बेंदूर आणि न्यूरा-ओ-ग्रान्डे या ठिकाणी तीन नवी क्रॉसिंग स्थानकं बांधण्याचा प्रस्ताव आहे.
तसेच गोकर्ण, होन्नावर, बरकूर, उडुपी, अंकोला या ठिकाणी लूप मार्गिका तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 696.77 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी आणि कोंडी कमी करण्यात यश येण्याची शक्यता आहे.
याशिवाय मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचे डबे वाढवण्याचाही प्रस्ताव आहे. या ट्रेनसाठी मोटी डिमांड आहे अशी माहिती झा यांनी 'मिड डे' ला दिली.
वंदे भारत ट्रेन सध्या आठ डब्यांची आहे. मुंबई लोकलहूनही (mumbai local) कमी डबे असलेल्या या ट्रेनमधून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर एक्सप्रेसची क्षमता वाढवण्याची गरज आहे.
याशिवाय या मार्गावर 11 लेवल-क्रॉसिंग गेट, 48 स्थानकांवर विद्युत इंटरलॉकिंग प्रणाली आणि कवच प्रणालीही विकसित केली जाणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
हेही वाचा