
मुंबईतील (mumbai) नवजात शिशूंच्या (newborn babies) मृत्युदरात घट झाली आहे. उपचार सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि पालिका रुग्णालयांतील आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) रुग्णालयांमधील नवजात शिशूंना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
एनआयसीयू व्यवस्थापन, सीएसआर उपक्रम आणि ऑनलाइन डॅशबोर्ड सादरीकरण तसेच बालरोगतज्ज्ञ आणि नवजात शिशुरोगतज्ज्ञ यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.
महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील एनआयसीयू सुविधांचे सक्षमीकरण, नवजात शिशूंना अत्याधुनिक उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले.
तसेच सीएसआरच्या माध्यमातून वैद्यकीय पायाभूत सुविधा व आवश्यक संसाधनांची उभारणी, रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्थापन अधिक पारदर्शक, प्रभावी आणि कार्यक्षम करण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले.
यावेळी विविध महानगरपालिका (bmc) वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील तज्ज्ञांनी नवजात शिशूंच्या आरोग्य सेवेतील सध्याच्या आव्हानांवर मार्गदर्शन केले.
हेही वाचा
