'रेड लाईट'मधलं लॉकडाऊन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या कित्येक दशकांपासून मुंबईतलं कामाठीपुरा हे ठिकाणं देहविक्री करणाऱ्या हजारो महिलांचं घर म्हणून ओळखलं जातं. या रेड लाइट एरियात देशाच्या कानाकोपऱ्यातून इतकंच काय तर शेजारच्या देशांतून आलेल्या महिला देहविक्रीचा व्यवसाय करून आपल्या पोटाची खळगी भरतात.

सध्या कोरोनामुळे कामाठिपुरातील महिलांवरही मोठं संकट कोसळलंय. लाॅकडाऊनमुळे यांचाही व्यवसाय ठप्प झालाय. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलीय. रोजचं जगणं कठीण झालंय आणि पदराखालच्या मुलांना वाढवायचं कसं? असा प्रश्नही त्यांना सतावू लागलाय.  

लाॅकडाऊनच्या सक्तीनं त्यांना अरूंद गल्ल्या, गच्च भरलेल्या खोल्या, कोंदट वातावरणात राहायला भाग पाडलंय. पोलिसांच्या धास्तीने बाहेर येऊन मोकळा श्वास घेणंही त्यांना नकोसं वाटतंय.

सध्या काही सामाजिक संस्था, कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या हाती अन्नाचे पॅकेट सोपवले जात आहेत. इतकाच काय तो दिलासा.


हेही वाचा

कोरोनामुळे घेतला 'हा' निर्णय, चिंतामणीची १०० वर्षांची परंपरा खंडित

पुढील बातमी
इतर बातम्या