Advertisement

कोरोनामुळे घेतला 'हा' निर्णय, चिंतामणीची १०० वर्षांची परंपरा खंडित

कोरोनामुळे मुंबईच्या चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळानं एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे घेतला 'हा' निर्णय, चिंतामणीची १०० वर्षांची परंपरा खंडित
SHARES

दरवर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण यावर्षी महाराष्ट्रावर कोरोनाव्हायरसचं सावट आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सव कसा साजरा करायचा याची सर्वांनाच चिंता आहे. विशेष करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढे मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.

गणेशोत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी येतात. कोरोनाच्या परिस्थितीत या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे आणि सोशल डिस्टंनसिंग कसे पाळावे याचा पेच सार्वजनिक मंडळांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुंबईच्या एका गणेशोत्सव मंडळानं एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळनं यंदाचा गणेश आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय पाटपूजन सोहळाही रद्द करण्यात आला आहे. गर्दी न करण्याच्या शासनाच्या निर्णयाचं पालन करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्यामुळे आगमन आणि पाटपूजन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठराविक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणानं पाटपूजन सोहळा होईल. यावर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणानं साजरा केला जाईल. चिंतामणीची सजावट दरवर्षी आकर्षक असते. पण यावर्षी भव्य सजावट आणि रोषणाई न करता गणेशोत्सव साजरा केला जाईल. जमा होणाऱ्या वर्गणीतून सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणं आणि गरजूंकरिता रुग्णपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येईल.

कोरोनामुळे विभागीय वर्गणीदार यांच्या व्यतिरिक्त इतर भाविकांना मुखदर्शन घेता येणार नाही. उत्सव कालावधीत विभागीय वर्गणीदार यांना नियोजनानुसार ठकाविक वेळेत दर्शन घेता येईल. सं असं तरी इतर भाविकांनी निराश होऊ नये. कारण चिंचपोकळी चिंतामणी भक्तांसाठी ऑनलाईन उपलब्ध असेल. त्यामुळे उत्सव काळात भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं आहे.

परळ, लालबाग पाठोपाठ गिरगाव खेतवाडीत गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी अखिल खेतवाडीतील गणेश मंडळे सुद्धा साध्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दोन फुटापासून ते पाच फुटापर्यंत छोटया मुर्ती यंदा घडवण्यात येणार आहेत.

कोरोनाचं सावट असल्यानं यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक बंधनं येण्याची शक्यता आहे. मास्क लावणं, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग राखणं या नियमांचं पालन बंधनकारक असू शकतं. त्यामुळे यावर्षी अनेक मंडळांसाठी या सर्व नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करणं डोकेदुखी ठरू शकतं. आता इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय निर्णय घेतात किंवा ते सर्व नियमांचं पालन कशाप्रकारे करणार आहेत ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच. 



हेही वाचा

मुंबईच्या राजाचा मोठा निर्णय, यंदा 'असा' साजरा होणार गणेशोत्सव!

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा