प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक नामकिंत मंडळांनी त्यांचा यंदाचा गणेशोत्सव साधे पणात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवाची मूर्ती ही ३ फूट ठेवून तिचे विसर्जन ही कृत्रिम तलावत करण्याचा निर्णय घेतल्याचे या पूर्वीच घोषित केले आहे.

प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट, ‘या’ निर्णयावर सर्वांचे एकमत
SHARES

मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुशंगाणे गणेश मंडळांनी तयारीला सुरूवात जरी केली असली. तरी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या वेळी सर्वच मंडळांनी यंदाचा उत्सव ‘सरकार जो आदेश देईल, जी नियमावली लागू करेल, तसा यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाईल’ यावर एकमत केले आहे. मुंबईतील प्रमुख सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी बुधवारी बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचाः- कोरोनाचा कहर ! राज्यात दिवसभरात १४९ मृत्यूंची नोंद, तर ३२५४ नवे रुग्ण

जून महिन्याची सुरुवातीपासूनच यंदाच्या वर्षीच्या गणेशोत्सवाचे वेध लागणं अपेक्षित असतं. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी नव्या सजावटीपासून, मूर्तीपर्यंतची सर्वच आखणी करण्यासाठीची लगबग एव्हाना अनेकांच्या विचारांमध्ये सुरुही झालेली असते. पण, जगभरात आणि मुंबईतही दिवसागणिक वाढणारं कोरोना Coronavirus कोरोना विषाणूचं सावट पाहता हे चित्र काहीसं वेगळं दिसत आहे. याच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अनेक नामकिंत मंडळांनी त्यांचा यंदाचा गणेशोत्सव साधे पणात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक मंडळांनी यंदा गणेशोत्सवाची मूर्ती ही ३ फूट ठेवून तिचे विसर्जन ही कृत्रिम तलावत करण्याचा निर्णय घेतल्याचे या पूर्वीच घोषित केले आहे.  तर काही मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भाद्रपदातील गणेशचतुर्थी ऐवजी माघ महिन्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला.

 हेही वाचाः- तर पुन्हा लाॅकडाऊन करावं लागेल, उद्धव ठाकरेंचा इशारा

 देशावर आलेलं कोरोनाचं संकट आणि होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर मुंबईतील नामकिंत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई पोलिस आयुक्तांनी बुधवारी एक बैठक घेतली होती. या बैकित लालबागमधील प्रमुख मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. महाराष्ट्रात कोरोनाचं सावट गहिरं आहे. देशामध्येही दिवसागणिक कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, देशातून कोरोना संपवण्यासाठी किमान सप्टेंबरचा मध्य उजाडू शकतो. त्या पार्श्वभूमिवर पोलिस आयुक्तांनी काही सूचना गणेश मंडळांना सुचवल्या, त्यावर सर्वांनी कोणतिही अट न टाकता ‘सरकार जो आदेश देईल, जी नियमावली लागू करेल, तसा यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जाईल’ असे आश्वासन दिले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा