रस्तेमार्गे प्रवासाच्या वेळेत बचत करण्यासाठी मढ (madh) ते वर्सोवा (versova) असा खाडी पूल उभारला जाणार आहे. मात्र खारफुटीसाठी (mangroves) पर्यावरण आणि वन विभागाची आणि त्यानंतर उच्च न्यायालयाची मंजुरी यांमुळे पुलाच्या कामाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे.
आता दोन महिन्यांत या पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. मालाडमधील (malad) मढ ते वर्सोवा हा 21 ते 22 किमीचा प्रवास करण्यासाठी वाहनाने दीड तास लागतो. वाहतूककोंडी झाल्यास हा प्रवास कालावधी आणखी वाढतो.
त्यामुळे मढ-वर्सोवा खाडीवर पूल उभारून त्यांना दिलासा देण्याची मागणी होत होती. हा पूल झाल्यास दीड तासाचं अर्थात 90 मिनिटांच अंतर कमी होऊन प्रवास 10 मिनिटांवर येईल.
त्यानुसार मुंबई महापालिकेने (brihanmumbai municipal corporation) खाडीवर पूल उभारणीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र (maharashtra) कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटीकडून यासाठी हिरवा कंदील दाखवला.
सीआरझेडकडूनही परवानगी मिळाली. कंत्राटदाराचीही नियुक्ती केली. पावसाळ्यासह तीन वर्षांच्या कालावधीत या पुलाची उभारणी केली जाणार आहे.
या प्रकल्पात खारफुटीची झाडे तोडावी लागणार आहेत. मात्र त्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राच्या पर्यावरण आणि वन विभागाकडे पाठवण्यात आला नव्हता.
जुलै 2025 मध्ये हा प्रस्ताव पाठवण्यात आला, त्याला मंजुरी मिळणे बाकी आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर उच्च न्यायालयाकडून मंजुरी घेऊनच खारफुटीची झाडे तोडावी लागणार आहेत. त्यानंतरच प्राथमिक कामांना सुरुवात होईल.
या प्रक्रियेसाठी लागणारा विलंब पाहता येत्या दोन महिन्यांत मढ-वर्सोवा पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (piyush goyal) यांनी मुंबई महापालिकेसोबत विविध कामांसंदर्भातील आढावा बैठक रविवारी घेतली. त्यावेळी दोन महिन्यात हे काम सुरू होईल, असेही महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
मढ-वर्सोवा पुलाचा अंदाजित खर्च 3 हजार 900 कोटी रुपये आहे. पूलउभारणी झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या दहा मिनिटांत होणार आहे. बोटीच्या मार्गातील अडथळे आणि बांधकामावेळी गाळ साचण्याची शक्यता यांमुळे मच्छिमारांनी प्रकल्पाला विरोध केला होता.
हेही वाचा