मुख्यमंत्र्यांनी दिल्या होळीच्या शुभेच्छा अन् ‘हा’ इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असं आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दंडात्मक कारवाईचे आदेश

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतो आहे. त्यासाठी रविवार (२८ मार्च) पासून १५ एप्रिल २०२१ पर्यंत रात्रीच्या (रात्री ८ ते सकाळी ७ वा.पर्यंत) वेळी जमावबंदी लागू केली आहे. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसूत्रीचं पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत.

हेही वाचा- सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू

या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धूलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया. निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 

गर्दी नकोच

गर्दी नकोच. एकत्र येणं टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणं या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असं मानून सण साजरे करावेत. धार्मिक व सांस्कृतिक परंपरा देखील अशाच पद्धतीने नियम पाळून व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सणांच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला होळी आणि धूलिवंदन सणाच्या शुभेच्छा देतानाच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला होळीचा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून सुरक्षित वातावरणात साजरा करावा, असं आवाहन केलं आहे.

(maharashtra cm uddhav thackeray gives holi greetings to people)

हेही वाचा- लोकलची गर्दी टाळण्यासाठी ५० टक्के उपस्थितीचा बीएमसीचा आदेश
पुढील बातमी
इतर बातम्या