मद्याचे दर वाढणार, सरकारकडून व्हॅटमध्ये मोठी वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सरकारच्या नव्या निर्णयामुळं रेस्टॉरन्ट, बार, क्लब आणि कॅफेमधील मद्याचे दर वाढणार आहे. त्यामुळं तळीरामांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. एकप्रकारे शिंदे-फडणवीस सरकारने तळीरामांना मोठा दणका दिला आहे.

मद्यावरील व्हॅटचा दर वाढवण्याचा निर्णय उत्पादन शूल्क विभागाकडून घेण्यात आला आहे. परिणामी दारू, वाईन आणि बिअरचे दर वाढणार आहे. 

परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावर सरकारने पाच टक्क्यांनी अतिरिक्त व्हॅट आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता क्लब, कॅफे किंवा बारमध्ये जावून दारू रिचवण्याचा प्लॅन करणाऱ्या तळीरामांना आणखी खिसा रिकामा करावा लागणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच मद्याच्या दरात किंचित वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पाच टक्के व्हॅट वाढवण्यात आल्याने मद्याचे दर वाढणार आहे.

सरकारकडून पाच टक्क्यांचा अधिकचा व्हॅट आकारण्याचा निर्णय केवळ बार, कॅफे आणि क्लब यांनाच लागू करण्यात येणार आहे. त्यामुळं बारचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी सरकारने अबकारी परवाना शूल्कात मोठी वाढ केली होती. त्यानंतर आता व्हॅटमध्ये पाच टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने बारचालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा

ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण

भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

पुढील बातमी
इतर बातम्या