Advertisement

भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

'आम्ही पुणेकर फाऊंडेशन' आणि 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती' यांच्या पुढाकाराने हा पुतळा साकारण्यात आला आहे.

भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा
SHARES
भारत पाक सीमेवर मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती देण्यासाठी जम्मू काश्मीर मधील कुपवाडा येथे भारत पाक सीमेवर छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून आज मुंबईत राजभवन येथून जंगी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांचा हस्ते विधिवत हा पुतळा रवाना करण्यात आला.

 'आम्ही पुणेकर फाउंडेशन' व 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे.

'आम्ही पुणेकर फाउंडेशन' व 'छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांनी भारत पाक सीमेवर छत्रपती शिवराय यांचा पुतळा उभारण्याचे ठरवले होते. त्यानुसार शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. हा पुतळा मुंबईतील राजभवन येथून रवाना करण्यात आला. यावेळी राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. राज्यपालांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन तसेच रथपूजन यावेळी करण्यात आले.

देशाच्या सीमेवर अनेक मराठी जवान देशरक्षणाचे काम करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना हजार हत्तींचे बळ लाभेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. कुपवाडा येथील महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा