Advertisement

महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणार 'ही' खास सुविधा

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते याचे लोकार्पण करण्यात आले.

महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणार 'ही' खास सुविधा
SHARES

महालक्ष्मी मंदिरात दररोज हजारो भाविक येत असतात. येणारे वृद्ध नागरिक व इतर गरजू व्यक्तींना मंदिरात जाण्यासाठी बॅटरीवर धावणारी कार उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत (मुंबई कोस्टल रोड) केलेल्या भरावावर, भुलाभाई देसाई मार्ग येथील सार्वजनिक वाहनतळ ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत फूटपाथ बांधला आहे. याचे लोकार्पण मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

नवीन अतिरिक्त फूटपाथ नवरात्रीपूर्वी बांधून पूर्ण करण्याचे आश्वासन पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले होते. ही कालमर्यादा पाळून हा सहा मीटर रुंद आणि अंदाजे ३०० मीटर लांबीचा फूटपाथ घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुला करून दिल्याबद्दल केसरकर यांनी पालिकेचे कौतुक केले.

महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या भाविकांना, मंदिरात सहजरित्या पोहोचता येईल अशा उपाययोजना करून फूटपाथ तयार करण्याचे व मंदिरालगत वाहनतळ सुरू करण्याच्या सूचना केसरकर यांनी केल्या होत्या.

मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना आपले वाहन सार्वजनिक वाहनतळात पार्क करून, फूटपाथचा वापर करत ते मंदिरापर्यंत पोहोचू शकतात. पदपथाचा आपत्कालीन परिस्थितीतदेखील वापर करणे शक्य होईल, अशारीतीने बांधण्यात आला आहे.



हेही वाचा

नवरात्रोत्सवात 'या' ठिकाणी YouTubers ना परवानगी नाही!

मास्क वापरण्यावरून पसरलेल्या बातम्यांबाबत बीएमसीचे स्पष्टीकरण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा